Homeबॅक पेजनागपूर विभागातील राज्य...

नागपूर विभागातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आता ई-पीपीओ!

नागपूर क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण वृद्धी करिता प्रधान महालेखापाल कार्यालय नागपुर यांच्याव्दारे इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर्स – ई-पीपीओ जारी करण्यात येणार असून एक पथदर्शी प्रकल्प म्हणून 1 डिसेंबर 2023 पासून नागपूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना ई-पीपीओ पाठविले जातील.

पेन्शनर्सला अनुकूल असणाऱ्या या डिजीटील पुढाकाराचा शुभारंभ जया भगत, प्रधान महालेखापाल यांचे हस्ते 23 नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता प्रधान महालेखापाल नागपुर कार्यालय येथे झाला. ईपीपीओ या उपक्रमाव्दारे कोषागार अधिकाऱयांद्वारे पेन्शनचे वितरण सुव्यवस्थित व गतीने होण्याची अपेक्षा आहे.

सध्या पेन्शन प्रकरणे निकाली काढल्यानंतर अनेक पानांची व अनेक घड्यांची छपाईपूर्व लेखनसामुग्री पीपीओ छपाई करिता वापरात येत असते. ह्या पीपीओचे प्राधिकार पत्र सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी नंतर प्रधान महालेखापाल कार्यालयाद्वारे शीघ्र डाकेने पाठविले जातात. बऱ्याच वेळा पीपीओ प्राधिकार पत्रे प्रधान महालेखापाल कार्यालयाने पाठविल्या नंतर 10 ते 15 दिवसानंतर पेन्शनर, कोषागार अधिकारी व आहरण व संवितरण अधिकाऱयांना प्राप्त होतात. पेन्शनर्सला उत्तम सेवा प्रदान करण्याच्या लोकसेवा प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्रधान महालेखापाल कार्यालयाद्वारे एक पारदर्शक, सुरक्षित आणि वापरकर्त्यास अनुकूल असे माध्यम म्हणजे ई-पीपीओ या सुविधेचा समावेश करण्यात आला आहे. आता अशी प्राधिकार पत्रे सर्व भागधारकांना त्याच दिवशी प्राप्त होतील ज्या दिवशी प्राधिकार पत्रे अंतिम होतील आणि पेन्शनरला केव्हाही व कुठूनही सहज उपलब्ध होतील.

डिजिटल पीपीओ, जलदगती प्रक्रिया व तात्काळ वितरण, एस एम एस द्वारे पेन्शनर ला सूचनेद्वारे तात्काळ माहिती, महाराष्ट्र शासनाच्या “महाकोष” संकेतस्थळावर ई-पीपीओची सहज उपलब्धता ही या ई-पीपीओची वैशिष्ट्ये आहेत.

नागपूर क्षेत्रातील अन्य जिल्हे, अमरावती व औरंगाबाद क्षेत्रातील जिल्हे येथून सेवानिवृत्त होणाऱ्या महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱयांना सुद्धा ई-पी पी ओ पाठविण्याचा संकल्पही  प्रधान महालेखापाल II, नागपुर या कार्यालयाने केला आहे. सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समाधानासाठी ‘पेंशन समाधान एक डिजीटल विंडो’ चेही 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता प्रधान महालेखाकार कार्यालयातील सभागृहात उद्घाटन झाले.

प्रधान महालेखाकार कार्यालयाच्या वतीने ‘पेंशन आपल्यादारी’ हा कार्यक्रम विदर्भ व मराठवाडा विभागात आपल्या अधिकार क्षेत्रात वरीष्ठ नागरिकांसाठी पेंशन संबंधित डिजिटल उपक्रम सुरु केला आहे. या नवीन अभिनव कार्याक्रमात पेंशनधाकरकांना अनुकूल विकल्पासह योजनेत सहभागी करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे महालेखाकार कार्यालयाचे अधिकारी विडियो कॉलद्वारे पेंशनधारकांच्या घरी जातील व त्यांच्या पेंशन विषयी समस्या जाणून घेतील. पेंशन समाधान योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज किंवा पीएजी कार्यालय टोल फ्री क्रमाक 1882337834 या इंटरकॉम फोनकॉलच्या माध्यमातून नोंदणी करता येईल.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content