Homeकल्चर +देव आनंद यांना...

देव आनंद यांना 100व्या जयंतीनिमित्त अनोखी आदरांजली!

सुप्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांच्या 100 व्या जयंती निमित्त, 26 सप्टेंबर 2023 रोजी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी)- भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) च्या वतीने देव आनंद यांच्या सात चित्रपटांचे सादरीकरण केले जाणार आहे. देव आनंद यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या 100व्या जयंती निमित्त त्यांचे चार सर्वोत्तम चित्रपट 4K रिझोल्यूशनमध्ये एनएफडीसी-एनएफएआयने, पुनर्संचयित केले आहेत.

राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियाना अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या चित्रपटांच्या जतनासाठी निधी दिला आहे. गाईड, ज्वेल थीफ, आणि जॉनी मेरा नामचे 35 मिमी आणि सीआयडीचे 35 मिमी डुप निगेटिव्हचे  अत्याधुनिक आर्काइव्हल फिल्म स्कॅनरवर 4K रिझोल्यूशनमध्ये स्कॅन केले गेले आहे. संबंधित चित्रपट एनएफडीसी-एनएफएआयमधे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता नियंत्रित वातावरणात अनेक दशकांपासून जतन केले गेले आहेत. दीर्घकालीन जतनामुळेच हे सार्वकालिक चित्रपट नवीन 4K तंत्रज्ञानात जतन करणे शक्य झाले आहे. या माध्यमातून, देव आनंद यांच्या कारकिर्दीची नव्या पिढीला ओळख करून देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा एनएफडीसी-एनएफएआयचा मानस आहे.

देव आनंद यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर, एनएफडीसी-एनएफएआय गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या काही चित्रपटाच्या जतन-संवर्धनावर काम करत आहे. यात प्रत्येक फ्रेम-दृश्य काळजीपूर्वक जतन केले जात आहे. कालौघात त्यावर साचलेली धूळ, घाण, चरा किंवा तडा, छिद्र, ओरखडे आदी डिजिटल पद्धतीचा वापर करुन दूर केले आहेत.

3 तासांच्या चित्रपटात 2.5 लाखांहून अधिक फ्रेम्स-दृश्य असतात, त्यावर काम करणे आवश्यक आहे. यानंतर रंगाची वर्गवारी केली जाते. जेणे करून चित्रपट प्रदर्शित करताना तो उत्तम दिसावा यासाठी रंग फिकट होण्यासारख्या समस्येचे निराकरण केले जाते. त्याचबरोबर चित्रपटाचा ध्वनीदेखील डिजिटल माध्यमात जतन केला जात आहे. याची अंतिम प्रत तयार होईल तेव्हा प्रेक्षकांना वाटेल की जणू काही फोटोकेमिकल फिल्म लॅबमध्ये प्रक्रिया करून नवी कोरी ताजी प्रत आली आहे.

एनएफडीसी-एनएफएआय पुणे इथल्या मुख्य चित्रपटगृहात हा चार दिवसांचा महोत्सव सध्या सुरू आहे. एनएफडीसी-एनएफएआयने विचारपूर्वक निवडलेले चित्रपट यात प्रदर्शित केले जात आहेत. देव आनंद यांच्या “बाजी” (1951), “सी.आय.डी.” (1956), “असली-नकली” (1962), “तेरे घर के सामने” (1963), “गाइड” (1965), “ज्वेल थीफ” (1967), आणि “जॉनी मेरा नाम” (1970) या सिनेमातील दमदार अभिनयाचा आनंद प्रेक्षकांना घेता येतोय. चित्रपटांचे सादरीकरण 35 मिमी प्रिंट्स आणि 4K जतनाचे मिश्रण आहे. यात, “बाजी”, “असली-नकली”, “तेरे घर के सामने” 35 मिमी प्रिंटमध्ये आणि “सी.आय.डी.”, “गाईड”, “ज्वेल थीफ”, आणि “जॉनी मेरा नाम” 4k रिझोल्यूशनमध्ये आहेत. चित्रपट प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आहे.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content