Homeचिट चॅटनेक्सस सीवूड्सचा ब्लॅक...

नेक्सस सीवूड्सचा ब्लॅक फ्रायडे सेल सुरू!

भारतातील सर्वात मोठा रिटेल प्लॅटफॉर्म असलेल्या नेक्सस सिलेक्ट मॉल्स यांनी त्यांच्या खास ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईचं आकर्षण असलेल्या नेक्सस सीवूड्स मॉलमध्येही हा सेल आज, शुक्रवार २४ नोव्हेंबर ते रविवार २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. या तीन दिवसांत वेगवेगळ्या आकर्षक ब्रँड्सवर ५० टक्क्यांपर्यंत सूट असेल.

सीवूड्स स्टेशनमध्येच असलेला नेक्सस सीवूड्स हा मॉल नवी मुंबईचं आकर्षण मानलं जातं. दिवाळी असो किंवा नवीन वर्षाचं स्वागत, ओणम् असो किंवा पोंगल आणि प्रजासत्ताकदिन असो किंवा स्वातंत्र्यदिन प्रत्येक सणासुदीच्या काळात नेक्सस सीवूड्सतर्फे आपल्या ग्राहकांसाठी विविध आकर्षक योजना आणि उपक्रम राबवण्यात येतात. ग्राहकांना खरेदीपलीकडे एक उत्तम अनुभव मिळावा, यासाठी नेक्सस सीवूड्स मॉल नेहमीच प्रयत्नशील असतो. या ब्लॅक फ्रायडे सेलदरम्यानही नेक्सस सीवूड्समधील ५०पेक्षा जास्त ब्रँड्सनी जवळपास ५० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. तसंच नवी मुंबईकरांसाठी मॉल हे तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

मुंबईत आता मस्त थंडी सुरू होईल. त्याआधी तुमचा वॉर्डरोब खास थंडीच्या कपड्यांसाठी तयार करायला हवा. त्याशिवाय नंतर येणारा नाताळ आणि नवीन वर्ष यासाठीही तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी भेटवस्तू घ्यायच्या असतील, तरी ही उत्तम संधी आहे. अधिकाधिक ग्राहकांनी या सेलचा लाभ घ्यावा, असं आवाहन नेक्सस सीवूड्सच्या व्यवस्थापनाने केलं आहे.

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content