Homeकल्चर +'नारी तू नारायणी' हे...

‘नारी तू नारायणी’ हे केवळ घोषवाक्य नको!

आधुनिक शिक्षण महिलांना सबलता देणारे असून शिक्षणातून सक्षम महिला घडवायच्या असतील तर महिलांचे कर्तृत्त्व हे त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ‘नारी तू नारायणी’ हे केवळ घोषवाक्य न राहता प्रत्येक स्त्रीने आपल्या परीने सामाजिक, राष्ट्रीय समानता ठेवून कार्य केले पाहिजे, असे विचार एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केले.

विश्वभरारी फाऊंडेशन आयोजित भरारी प्रकाशनच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मुंबईतल्या विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ येथे नुकताच आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना, या लता गुठे यांनी लिहिलेल्या आणि संचित संस्कृतीचे या लेखिका स्मिता भागवत लिखित पुस्तकांचे प्रकाशन झाले. गेल्या ७ वर्षांत प्रकाशित झालेले भरारी प्रकाशनचे हे ३००वे पुस्तक आहे. आमदार पराग अळवणी, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे, प्रकाशिका लता गुठे, माध्यम सल्लागार जयू भाटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देशभक्ती हा रोजच्या जगण्यातील विषय आहे. प्रत्येकाने समाजासाठी आणि देशासाठी जेवढे काही करता येईल, तेवढे चांगले काम करावे, असे विचार आमदार पराग अळवणी यांनी व्यक्त केले. लता गुठे यांच्या प्रकाशन क्षेत्रातील कार्याचे कौतुक करत यापुढील पुस्तक `क्रांतिकारकांच्या घरच्यांचे जीवन’ या विषयावर प्रकाशित करण्याची सूचनाही त्यांनी केली.

`जगणं आमचं’ कार्यक्रमांतर्गत माध्यम सल्लागार जयू भाटकर यांनी विचारलेल्या मार्मिक प्रश्नांना वीरमाता अनुराधा गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेणुका बुवा आणि प्रकाशिका लता गुठे यांनी उत्तरे दिली. कॅ. विनायक गोरे यांच्या वीरमरणानंतर असंख्य विनायक तुझी वाट पहात आहेत, हे मुख्याध्यापकांचे वाक्य परिणाम करून गेले आणि क्षितिजामागून क्षितिजे उलगडत गेली. संकटात अदृश्य शक्ती साथ देते, असे विचार अनुराधा गोरे यांनी व्यक्त केले. शारीरिक आणि मानसिक फिटनेस हा पोलिसांच्या जीवनात आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत रेणुका बुवा यांनी २६-११ हल्ल्यात केलेल्या कार्याला आणि आठवणींना उजाळा दिला. मीच माझी गुरु आणि मीच माझी शिष्य या भावनेतून काम करून प्रकाशन आणि साहित्यिक क्षेत्रात आलेले अनुभव लता गुठे यांनी कथन केले.

डॉ. संपदा पाटगावकर यांनी लता गुठे लिखित स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांगना, पुस्तकातील उताऱ्याचे प्रभावी वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी केले. सायली वेलणकर यांनी प्रारंभी गणेश आणि शारदा वंदना सादर केली.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content