Sunday, June 23, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटप्रजासत्ताकदिनानिमित्त विजय सेल्‍सचा...

प्रजासत्ताकदिनानिमित्त विजय सेल्‍सचा मेगा सेल

देशवासीय प्रजासत्ताकदिन साजरा करण्‍यासाठी सज्‍ज असताना विजय सेल्‍स, या भारतातील आघाडीच्‍या इलेक्‍ट्रॉनिक्‍स ओम्‍नी-चॅनेल रिटेल साखळीला मेगा रिपब्लिक डे सेलसह लोकशाहीच्‍या उत्‍साहाच्‍या भव्‍य साजरीकरणाची घोषणा केली आहे. सेल कालावधीदरम्‍यान ग्राहक नवीन गॅझेट्स, होम अप्‍लायन्‍सेस अशा विविध डिवाईसेसवर आकर्षक ऑफर्स व अचंबित करणाऱ्या सूटसह अभूतपूर्व खरेदीचा अनुभव घेऊ शकतात. क्रांतिकारी स्‍मार्टफोन्‍स ते अत्‍याधुनिक स्‍मार्ट वॉचेस्, अत्‍याधुनिक लॅपटॉप्‍स व घरगुती जीवनावश्‍यक वस्‍तूंपर्यंत विजय सेल्‍सकडे प्रत्‍येकासाठी काहीतरी आहे.

आयफोन्‍सवर मेगा डिल्‍स

विजय सेल्‍सच्‍या मेगा डिल्‍ससह आयफोन्‍सच्‍या विश्‍वामधील असाधारण प्रवासाला सुरूवात करा. फक्‍त ५२,४०० रूपयांपासून सुरू होणारा आयफोन १३ खरेदी करा किंवा आयफोन १५ व आयफोन १५ प्रो मॅक्‍ससह भविष्‍याचा अनुभव घ्‍या, ज्‍यांची किंमत अनुक्रमे ६८,९०० रूपये व १,४९,४०० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये त्‍वरित बँक सूटचा समावेश आहे, ज्‍यामधून तुम्‍हाला खिशावर अधिक भार न पडता सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा अनुभव मिळेल.

श्रेणींमध्‍ये सर्वोत्तम तंत्रज्ञान

विजय सेल्‍स यंदा प्रजासत्ताक दिनाला अद्वितीय किमतींमध्‍ये सर्वोत्तम तंत्रज्ञान देत आहे. फक्‍त ६,३९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या स्‍मार्टफोन्‍सच्‍या विविध श्रेणीमधून निवड करा. ८,९९० रूपयांपासून सुरू होणाऱ्या टेलिव्हिजन्‍सच्‍या व्‍यापक श्रेणीसह अल्टिमेट मनोरंजनाचा अनुभव घ्‍या. १५,९९० रूपयांपासून सुरू होणाऱ्या लॅपटॉप्‍ससह आणि १२,४९० रूपयांपासून सुरू होणाऱ्या टॅब्‍लेट्ससह वर्क-फ्रॉम-होम अनुभव अधिक उत्‍साहित करा. फक्‍त ६९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या ट्रूली वायरलेस इअरबड्ससह संगीत ऐकण्‍याचा आनंद घ्‍या. ८९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या स्‍मार्टवॉचेससह कनेक्‍टेड राहण्‍यासोबत स्‍टायलिश दिसा.

अॅक्‍सेसरीज आणि दैनंदिन अप्‍लायन्‍सेसचा शोध घ्‍या

फक्‍त १४९ रूपयांपासून सुरू होणारे केबल, चार्जर्स, पेनड्राइव्‍ह्ज इत्‍यादीसारख्‍या इलेक्‍ट्रॉनिक अॅक्‍सेसरीजसह तंत्रज्ञान अनुभवामध्‍ये वाढ करा. ६,४९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या कॅमेऱ्यांसह जीवनातील बहुमूल्‍य क्षणांना कॅप्‍चर करा. ७,९९० रूपयांपासून सुरू होणाऱ्या वॉशिंग मशिन्‍ससह लॉण्‍ड्री अनुभव सुलभ करा आणि ४९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या इस्‍त्री व गारमेंट स्‍टीमर्ससह दैनंदिन काम सुलभपणे करा. ग्राहक ४९९ रूपयांपासून सुरू होणारे ट्रिमर्स आणि ४९९ रूपयांपासून सुरू होणारे इतर स्‍टायलिंग अप्‍लायन्‍सेस देखील खरेदी करू शकतात.

या सेल कालावधीदरम्‍यान विजय सेल्‍स विविध सूट देत आहे, जेथे रेफ्रिजरेटर्सची किंमत ८,९९० रूपयांपासून सुरू होते आणि एअर कंडिशनर्सची किंमत २७,९९० रूपयांपासून सुरू होते. २९९ रूपयांपासून सुरू होणारे किचन अप्‍लायन्‍सेस, ७४९ रूपयांपासून सुरू होणारे हँड ब्‍लेण्‍डर्स, ज्‍यूसर्स अॅण्‍ड मिक्‍सर्स आणि ५,९०० रूपयांपासून सुरू होणाऱ्या मायक्रोव्हेव्ह्जसह कूकिंग अनुभव अधिक सुलभ करा. १,१९९ रूपयांपासून उपलब्‍ध असलेले रूम हिटर्स आणि जवळपास ५० टक्‍क्‍यांच्‍या सूटसोबत उपलब्‍ध असलेल्‍या गिझर्ससह हिवाळ्यामध्‍ये सकाळच्‍या वेळी लागणाऱ्या गारव्‍यावर मात करा.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घ्‍या

विजय सेल्‍सच्‍या रिपब्लिक डे सेलसह अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध घ्‍या, जेथे ग्राहक नवीन लाँच करण्‍यात आलेली उत्‍पादने देखील खरेदी करू शकतात. विजय सेल्‍सच्‍या १३०हून अधिक स्‍टोअर्समध्‍ये, तसेच www.vijaysales.com वर रेडमी नोट १३ सिरीज, विवो एक्‍स१०० सिरीज, ओप्‍पो रेनो ११ प्रो आणि बोस क्‍वाइटकम्‍फर्ट अल्‍ट्रा वायरलेस हेडफोन्‍स उपलब्‍ध आहेत. याव्‍यतिरिक्‍त, ग्राहक नुकतेच लाँच करण्‍यात आलेला सॅमसंग गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज स्‍मार्टफोन २००० रूपयांच्‍या किमान किंमतीमध्‍ये प्री-बुक करू शकतात.

विजय सेल्‍स येथे खरेदी करण्‍यासाठी लक्षवेधक कारणे

विजय सेल्‍सच्‍या रिपब्लिक डे एक्‍स्‍ट्रावॅगन्‍झासह खरेदीचा आनंद घ्‍या, ज्‍यामध्‍ये नो कॉस्‍ट ईएमआयवर टॉप ऑफर्स, एकस्‍चेंजवर आकर्षक डिल्‍स आणि निवडक उत्‍पादनांवर नेक्‍स्‍ट-डे डिलिव्‍हरीचा समावेश आहे. ग्राहकांना विजय सेल्‍स मायव्‍हीएस रिवॉर्ड्स लॉयल्‍टी उपक्रमाच्‍या माध्‍यमातूनदेखील फायदा मिळू शकतो, जो प्रत्‍येक खरेदीवर लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स म्‍हणून ०.७५ टक्‍के परतावा देतो. अद्वितीय किमतींमध्‍ये घरी आधुनिक तंत्रज्ञान आणण्‍याची संधी चुकवू नका. यंदाचा प्रजासत्ताकदिन विशेष करण्‍यासाठी जवळच्‍या विजय सेल्‍स स्‍टोअरला भेट द्या किंवा विजयसेल्स डॉटकॉम येथे आमच्‍या ऑनलाइन व्‍यासपीठाला भेट द्या.

विजय सेल्‍सचे संचालक निलेश गुप्‍ता म्‍हणाले की, आम्‍हाला विजय सेल्‍स येथे मेगा रिपब्लिक डे सेलचे अनावरण करताना आनंद होत आहे. हा सेल तंत्रज्ञान व नाविन्‍यतेचे साजरीकरण आहे. यंदा प्रजासत्ताक दिनाला आम्‍ही ग्राहकांना आघाडीच्‍या ब्रॅण्‍ड्सवर अद्वितीय ऑफर्ससह तंत्रज्ञान प्रवासाला सुरूवात करण्‍याचे आवाहन करतो. आयफोन्‍स ते स्‍मार्टवॉचेस्, लॅपटॉप्‍स आणि दैनंदिन अप्‍लायन्‍सेसपर्यंत आमची वैविध्‍यपूर्ण श्रेणी प्रत्‍येक गरजेची पूर्तता करते. ग्राहक सूटसोबत सोईस्‍कर खरेदी अनुभव जसे नो कॉस्‍ट ईएमआय, एक्‍स्‍चेंज डिल्‍स आणि सुलभ नेक्‍स्‍ट-डे डिलिव्‍हरी यांचादेखील लाभ घेऊ शकतात.

आकर्षक त्‍वरित बँक सूट आणि ऑफर्स

तसेच, ग्राहक त्‍यांच्‍या खरेदीवर त्‍वरित बँक सूटचादेखील लाभ घेऊ शकतात. एचएसबीसी बँक ग्राहक २०,००० रूपयांवरील क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ७.५ टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास ५००० रूपये सूट मिळवू शकतात. येस बँक ग्राहक १०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ५ टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास २,५०० रूपये सूट मिळवू शकतात. आरबीएल बँक ग्राहक १५,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ७.५ टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास ३,५०० रूपये सूट मिळवू शकतात. वन कार्डधारक क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ५ टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह ७,५०० रूपये सूट मिळवू शकतात आणि १५,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर १,००० रूपयांची सूट मिळवू शकतात.

अॅमेक्‍स क्रेडिट कार्डधारक क्रेडिट कार्ड ईएमआय व्‍यवहारांवर ७.५ टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह ६,००० रूपये सूट मिळवू शकतात आणि ३०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास ५,००० रूपयांची सूट मिळवू शकतात. एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक कार्डधारक त्‍यांच्‍या डेबिट कार्ड नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर १० टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास २,००० रूपयांची सूट मिळवू शकतात आणि फक्‍त रविवारी १०,००० रूपयांपेक्षा अधिक क्रेडिट कार्ड नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर जवळपास १००० रूपयांची सूट मिळवू शकतात. डीबीएस बँक क्रेडिट कार्डधारक फक्‍त स्‍टोअर्समध्‍ये १५,००० रूपयांपेक्षा अधिक ईएमआय व्‍यवहारांवर १० टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास २,५०० रूपये सूट मिळवू शकतात. फेडरल बँक क्रेडिट कार्डधारक ईएमआयवर आणि १५,००० रूपयांपेक्षा अधिक नॉन-ईएमआय व्‍यवहारांवर १० टक्‍क्‍यांच्‍या त्‍वरित सूटसह जवळपास ५,००० रूपये सूट मिळवू शकतात.

Continue reading

एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायासाठी व्यावसायिक प्रशिक्षण

फेडरल एक्‍स्‍प्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्‍स्‍प्रेस परिवहन कंपनी व्‍यावसायिक प्रशिक्षण स्‍कॉलरशिप्‍स देत जवळपास १०० एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायातल्या सदस्‍यांना अपस्किल करत आहे. या उपक्रमांतर्गत पात्र एलजीबीटीक्‍यूआयए+ व्‍यक्‍तींना सौंदर्य, शिवणकाम, नृत्‍य, मेकअप व मेहंदी कला अशा विविध क्षेत्रांमध्‍ये व्‍यावसायिक प्रशिक्षण...

मंदीच्या वातावरणातही एआय, एफएमसीजी क्षेत्रात रोजगारात वाढ

मंदीच्या वातावरणातही एआय, एफएमसीजी, ऑईल अँड गॅस क्षेत्रामधील रोजगारामध्‍ये वाढ झाल्याचे नोकरी जॉबस्‍पीकच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. नोकरी जॉबस्‍पीक इंडेक्‍स हा भारतातील व्‍हाइट कॉलर हायरिंग आघाडीचा सूचक एप्रिल २४च्‍या तुलनेत मे महिन्‍यामध्‍ये ६ टक्‍क्‍यांनी वाढला. पण गेल्‍या वर्षाच्‍या मे महिन्‍याच्‍या...

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी 25 जूनपर्यंत मुदतवाढ

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25करिता डी.एल.एड. (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 25 जून 2024पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी डी.एल.एड. (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 18 जून 2024पर्यंत होती. तथापि बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व...
error: Content is protected !!