Homeन्यूज अँड व्ह्यूजपाहा काट्याविना गुलाब...

पाहा काट्याविना गुलाब आणि करा म्हणीतही बदल

गुलाबाला काटे असतातच.. या म्हणीचा पुनर्विचार करण्याची वेळ आता आली आहे. गुलाबाचे फुले सर्वांनाच खूप आवडते. परंतु गुलाबाला काटे नसते तर ती फुले आपल्याला तितकीच आवडली असती का? असा प्रश्न साहजिकच मनात येऊन जातो. याचे उत्तर न देता वनस्पतीवर काम करणाऱ्या संशोधकांनी काट्याविना गुलाबाची रोपे तयार केली आहेत. मात्र त्यातून त्यांनी जे साध्य केले आहे ते अधिक महत्त्वाचे आहे. या संशोधनामधून हंगाम सोपा करू शकतील अशा पिकांचा शोध लावणे शक्य होणार आहे असे दिसते.

त्याअगोदर हे सांगायला हवे की काट्याविना गुलाबाची जात असते, नाही असे नाही. पण बहुधा सर्वसाधारणपणे आपल्याला काटे असलेला गुलाबच दिसतो. पण हेही बघायला मिळते की बोरे अथवा वांगी तसेच काही प्रकारचे टमाटे, बटाटे आणि तांदूळ यांनादेखील काटे असतात. इतकेच नव्हे तर असेही मानले जाते की काटे असलेली आणि काटेरी, या नावाने ओळखली जाणारी वांगी अधिक चवदार असतात. पण पीक म्हणून त्यांचा विचार केला तर त्यामध्ये अधिक श्रम आणि वेळ लागतो, असे अनुभवी लोक सांगतात.

अशी पिके तर सहज निघावीत आणि त्यात फारसा त्रास होऊ नये यासाठी अमेरिकेतील एक प्रयोगशाळा आणि स्पेनमधील यूपीव्ही ही पॉलिटेक्निक संस्था यांनी एकत्रपणे वांगी या पिकावर विश्लेषण आणि संशोधन सुरु केले. प्रयोगशाळेचे संशोधक प्रा. झकारी लिपमन आणि जेम्स सातर्ली यांना असे आढळले की एलओजी (Lonely Guy) या नावाची गुणसूत्रे पिकांमध्ये काटे निर्माण होऊ देत नाहीत. एलओजीमुळे पिकांच्या काही हार्मोन्सचे विश्लेषण सहज होऊ शकते. त्यामुळे पिकामध्ये काटे निर्माण होण्यासाठी हेच कारण असेल का, हे शोधण्यासाठी या चमूने फ्रान्स, कॅनडा, जर्मनी आणि ब्रिटन या देशांमधील संशोधकांशी संपर्क साधला. तेव्हा असे आढळले की, हा उत्क्रांतीचाच एक भाग असावा. कारण त्याचा परिणाम २० प्रजातींवर दिसत होता आणि त्यांचा लाखो वर्षे एकमेकांशी तसा संबंध नव्हता.

गुणसूत्रे संपादन करण्याच्या अत्याधुनिक अशा क्रिस्पर तंत्रज्ञानाचा उपयोग करून फ्रान्समधील संशोधन संस्थेने गुलाबाच्या पिकामधील काटे बरेच कमी करता येतील अशी प्रक्रिया सुरु केली आणि कॉर्नेल विद्यापीठाच्या संशोधकांनी एका फळपिकाचे काटे पूर्णपणे बंद केले. या प्रक्रियेमुळे पिकावर काहीही परिणाम झाले नाही. परंतु शेतीमध्ये अशा पिकांचा हंगाम घेत असताना शेत कामगारांना होणाऱ्या इजा कमी होऊन लोकांना काट्याविना गुलाबांचा आनंद घेता येईल, असे या संशोधन प्रबंधात म्हटले आहे. हा प्रबंध ‘सायन्स’ या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.   

Continue reading

टाकाऊ इलेक्ट्रॉनिक्समधले सोने मिळवले तरी दागिने महागच!

फार पूर्वीच्या काळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे फार बोजड असत आणि त्यामुळे ती सहजपणे हातात मावत नव्हती. त्यानंतर १९६०च्या दशकात हातात वागवण्यासारख्या स्वरुपात ट्रांझिस्टर नावाचे एक उपकरण बाजारात आले. त्यापूर्वी रेडिओ म्हणजे घरच्या टेबलावर किंवा कपाटात ठेवून त्यावर कार्यक्रम ऐकता येत...

दोन बापांच्या उंदराला पिल्ले…

या जगातले विज्ञान आजचे कोणतेही आश्चर्य प्रत्यक्षात घडवून आणते, हे जरी खरे असले तरी ‘दोन बापांचा’ ही मराठीत चक्क शिवी समजली जात असताना माणसाच्या दीर्घायुषी जीवनासाठी जे काही संशोधन होत आहे त्यासाठी उंदीर हाच प्राणी वापरला जातो. याचेही कारण...

आता अवकाशात भ्रमण करणार माणसाच्या अस्थी!

माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो की, माझे जेव्हा केव्हा बरेवाईट होईल त्यानंतर तुम्ही माझ्यावर अंत्यसंस्कार तर करालच, पण मी आजच्या...
Skip to content