Saturday, July 27, 2024
Homeएनसर्कलगाडीप्रमाणे पुणेकर विरोधकांची...

गाडीप्रमाणे पुणेकर विरोधकांची हवा काढतील!

पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर येथील महायुतीच्या चारही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचे आहे. पुणेकर खूप हुशार आहेत. एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल तर ते त्या गाडीची हवा काढतात. या निवडणुकीतदेखील विरोधी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पुणेकर त्यांची हवा काढतील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल लगावला.

लोकसभा निवडणुकीची ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नसून जगभरात भारताचा सन्मान वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध देशाची बदनामी करत फिरणारे राहुल गांधी यांच्यातच आहे,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. पुणेकर खूप हुशार आहेत. येत्या निवडणुकीत ते विरोधकांची हवा काढतील अशी टीका त्यांनी केली.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीच आहे. लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रेकॉर्डब्रेक सभा होत आहेत. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशाची १४० कोटी जनता आतूर आहे. हीच गॅरंटी समोर बसलेल्या अथांग जनसागराने दिली आहे.

‘प्राण जाए पर वचन ना जाए’ ही मोदींच्या कामाची पद्धत आहे. ते म्हणाले होते कलम ३७० हटवणार आणि त्यांनी कलम ३७० हटवले व आपल्या काश्मिरला भारताशी जोडले. राम मंदिर आपल्या सगळ्यांना स्वप्नवत वाटत होते. परंतु मोदींनी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिरांची उभारणी केली आणि करोडो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण झाले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मोदींच्या नसानसांत, रक्ताच्या प्रत्येक थेंबात देशभक्ती भरलेली आहे. जेव्हा मोदी द्वारका दर्शनासाठी पाण्याखाली गेले तेव्हाही त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे देशहिताची प्रार्थना केली. हाच मुख्य फरक देश बुडवणारे विरोधक आणि देशहिताची प्रार्थना करणारे मोदी यांच्यात आहे. भारताला महासत्ता करण्याचे वचनदेखील मोदी पूर्ण करून दाखवतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!