Saturday, July 27, 2024
Homeकल्चर +शुभंकरोती साहित्य मंडळ संमेलनाच्या...

शुभंकरोती साहित्य मंडळ संमेलनाच्या अध्यक्षपदी लता गुठे!

शुभंकरोति साहित्य मंडळ, धुळे या संस्थेच्या वतीने धुळे येथे १ फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येत असलेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिका लता गुठे यांची निवड झाली आहे.

लता गुठे गेली पंधरा वर्षे साहित्य क्षेत्रामध्ये साहित्यिका, प्रकाशिका, संपादिका म्हणून कार्यरत आहेत. संतसाहित्य ते बालसाहित्य अशा विविध विषयांवर त्यांची एकूण 22 पुस्तकं प्रकाशित आहेत. मोहक युरोप (प्रवास वर्णन) ‘सोलमेट’, ‘शोध अस्तित्त्वाचा’ दोन कथासंग्रह ‘मना मना दार उघड’ वैचारिक विषयावरील पुस्तक, ‘संत चैतन्याचा मेळा’ संतसाहित्यावरील पुस्तक, ‘भाव-विभोर’ ललित लेखसंग्रह, ‘माझे प्रेरणास्रोत’ मुलाखतींचे पुस्तक ७ कवितासंग्रह ‘बिन भिंतीची शाळा’, ‘इटुकले पिटुकले, ‘चांदण बाग’, ‘गमडी गंमत’ असे बालकथा/ कवितासंग्रह ही साहित्यसंपदा त्यांनी लिहिली आहे.

भरारी प्रकाशनच्या माध्यमातून अडीचशेपेक्षा जास्त पुस्तकांची निर्मिती केली आहे ‘तार्‍यांचे जग’, ‘धमाल मस्ती’ दिवाळी अंकांचे सातत्याने बारा वर्ष संपादन केले आहे. माझं प्रेम आणि स्वप्न कळ्या या दोन दोन्ही मुद्रिकांची निर्मिती आणि गीतलेखन त्यांनी केले आहे. अनेक साहित्यिक उपक्रमाचे आणि साहित्य संमेलनाचे सातत्याने आयोजन तसेच देश विदेशात साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभाग दिला आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या उज्जैनकर फाउंडेशन जळगाव या संस्थेच्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

लता गुठे ह्या विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हाध्यक्ष, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखा कार्यवाह अशा विविध साहित्यिक सामाजिक संस्थांचा त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.  विविध नामांकित संस्थांचे अनेक मान-सन्मान आणि पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

Continue reading

मास्टर्स पॉवरलिफ्टिंग राष्ट्रीय स्पर्धेत रमेश खरेंना सुवर्णपदक

मध्य प्रदेशमध्ये इंदौर येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स पॉवरलिफ्टिंग इक्विप्ड आणि अनईक्विप्ड स्पर्धेत रायगड, पेणच्या 75 वर्षीय रमेश खरे यांनी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. पेणच्या हनुमान व्यायामशाळेत सराव करणाऱ्या रमेश उर्फ आप्पा खरे यांची निवड 66 किलो वजनी...

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...
error: Content is protected !!