Homeहेल्थ इज वेल्थस्तनदा मातांनाही मिळणार...

स्तनदा मातांनाही मिळणार कोविडची लस!

स्तनपान करणाऱ्या सर्व महिलांसाठी कोविड-19 लसीकरण करण्याची शिफारस संबंधित राष्ट्रीय तज्ज्ञ गटाकडून करण्यात आली आहे. मात्र, गर्भवती महिलांच्या कोविड-19 लसीकरणासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाद्वारे (एनटीएटीआय) आणखी चर्चा केली जात असल्याचे सांगण्यात आले.

कोविड-19साठी लसीकरण प्रशासनावरील राष्ट्रीय तज्ज्ञ गटाने केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाबरोबर कोविड-19 लसीकरण संदर्भात नवीन शिफारसी सामायिक केल्या आहेत. या शिफारसी कोविड-19 महामारीमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीवर आणि जागतिक वैज्ञानिक पुरावे व अनुभव यावर आधारित आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने या शिफारसी स्वीकारल्या असून त्या त्यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनाही कळवल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संबंधित अधिकाऱ्यांना या शिफारसींची दखल घेण्याचे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. स्थानिक भाषांमध्ये माहिती व संप्रेषणविषयक सर्व मार्गांचा उपयोग करून सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे माहिती पोहोचविण्याचा सल्लाही केंद्राने राज्यांना दिला आहे. राज्यांना सर्व स्तरांवर लसीकरण कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण हाती घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

खालील परिस्थितीत कोविड-19 लसीकरण पुढे ढकलावे

  1. प्रयोगशाळा चाचणीत एखाद्या व्यक्तीला SARS-2 COVID-19 आजार सिद्ध झाल्यास: कोविड-19 लसीकरण पूर्ण बरे झाल्यापासून तीन महिने पुढे ढकलावे.
  2. SARS-2 COVID-19 रूग्ण ज्यांना अँटी सार्स-2 मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा देण्यात आले आहेत: कोविड-19 लसीकरण रुग्णालयातून घरी सोडल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर करण्यात यावे.
  3. ज्या लोकांना किमान 1 मात्रा मिळाली आहे आणि लसीकरण वेळापत्रक पूर्ण होण्यापूर्वी कोविड संसर्ग झाला आहे: कोविड-19 आजारापासून क्लिनिकलदृष्ट्या बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी दुसरी मात्रा घ्यावी.
  4. अन्य कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्तींना रुग्णालयात दाखल होण्याची किंवा आयसीयू सेवेची गरज असल्यास त्यांनीही कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी 4-8  आठवडे थांबावे.

एखादी व्यक्ती कोविड-19 आजाराने ग्रस्त असल्यास कोविड-19 लस मिळाल्यानंतर किंवा आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आल्यानंतर 14 दिवसांनंतर रक्तदान करू शकते.

कोविड-19 लसीकरण होण्यापूर्वी लस प्राप्तकर्त्यांची रॅपिड अँटीजेन चाचणी (आरएटी)द्वारे  तपासणीची आवश्यकता नाही.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content