Saturday, February 8, 2025
Homeएनसर्कल10 कोटींच्या कोरियन...

10 कोटींच्या कोरियन सिगारेट जप्त!

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने तस्करीविरोधातल्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत, 10.08 कोटींच्या परदेशात तयार करण्यात आलेल्या सिगारेट घेऊन जाणारा कंटेनर रोखत तो जप्त केला. चिनी धाग्याचे विणलेले गालिचे असल्याचे खोटे सांगत हा माल न्हावा शेवा बंदरात अत्यंत सावधपणे राबविलेल्या कारवाईदरम्यान उघडकीस आला.

मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय पथकाने, संयुक्त अरब अमिराती बंदरातून आयात करण्यात आलेल्या मालाचे दोन कंटेनर रोखले. पहिल्या कंटेनरची सविस्तर तपासणी केल्यावर, असे उघड झाले की कथित चिनी कापडाचे विणलेले गालिचे हे खरे तर परदेशी-ब्रँडच्या विशेषत: एस्से चेंज सिगारेट (कोरियामध्ये निर्मिती झालेले)चा संपूर्ण माल झाकण्यासाठी होते.

दुसरा कंटेनर, सुरुवातीला जुन्या आणि वापरलेल्या गालीच्यांचे 325 रोल (गुंडाळे) वाहून नेत आहे असे सांगितल्यामुळेदेखील संशय अधिक दुणावला. अगदी बारकाईने तपासणी केल्यावर असे आढळून आले की सीमाशुल्क अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी तस्कर माल झाकण्यासाठी या कापडाचा  वापर करत आहेत. या कापडाच्या गुंडाळ्यांमध्ये सिगारेटच्या एकूण 67,20,000 कांड्या लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याने, सीमाशुल्क कायदा, 1962च्या कलमानुसार, जुन्या आणि वापरलेल्या गालीचांसह सर्व मुद्देमाल तत्काळ जप्त करण्यात आला. यावेळी जप्त करण्यात आलेल्या सिगारेटची अंदाजे किंमत 10.08 कोटी रुपये इतकी आहे. या संदर्भातला पुढील तपास सुरू आहे.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content