उन्हाळ्यात त्वचा निस्तेज होणे, डिहायड्रेटेड आणि अकाली वृद्धत्व, यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशावेळी बदलत्या हवामानासह आपल्या स्किनकेअरमध्येदेखील बदल करत दैनंदिन नित्यक्रमामध्ये व्हिटॅमिन सी घटक समाविष्ट असणे गरजेचे आहे. द बॉडी शॉप या ब्रिटीशनिर्मित आंतरराष्ट्रीय एथिकल ब्युटी ब्रँडचे व्यापक व्हिटॅमिन सी कलेक्शन आहे. ग्लो रिव्हीलिंग सीरम ते ग्लो बूस्टिंग मॉइश्चरायझर आणि आय ग्लो सीरमसह इतर उत्पादनांपर्यंत द बॉडी शॉपची व्यापक व्हिटॅमिन सी श्रेणी प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूल असण्यास डिझाइन करण्यात आली आहे. हे कलेक्शन नैसर्गिकरित्या स्रोत मिळवलेल्या सर्वोत्तम घटकांपासून डिझाइन करण्यात आले आहे आणि उन्हाळ्यामध्ये त्वचा कोमल व तेजस्वी राहण्याची खात्री देते.

मुक्त रॅडिकल्स आणि अकाली एजिंगसाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा सामना करणारे शक्तिशाली अॅण्टीऑक्सिडण्ट व्हिटॅमिन सी त्वचा तेजस्वी ठेवण्यासोबत त्वचेवरील सुरकुत्या व बारीक रेषा नाहीसे करण्यास मदत करते. लोकप्रिय श्रेणीमधील काही उत्पादने व्हिटॅमिन सीचा नैसर्गिक संपन्नस्रोत कॅम्यू कॅम्यू बेरी अर्क, बाकुचोल आणि पपईचा अर्क यासह संपन्न आहेत.
अस्सल मास्टरपीस व्हिटॅमिन सी श्रेणी प्रत्येक प्रकारच्या त्वचेला अनुकूल अशा स्वरूपात बारकाईने डिझाइन करण्यात आली आहे. या व्यापक कलेक्शनमध्ये त्वचा तेजस्वी होण्यास मदत करणाऱ्या रेडियन्स-रिव्हायव्हिंग सुपरहिरो ग्लो रिव्हीलिंग सीरम, ग्लो बूस्टिंग मॉइश्चरायझर, डेअली ग्लो क्लीन्सिंग पॉलिश, ओव्हरनाइट ग्लो रिव्हीलिंग मास्क, ग्लो-रिव्हीलिंग लिक्विड पील, आय ग्लो सीरम आणि ग्लो-रिव्हीलिंग टॉनिक यांच्यासह इतर उत्पादनांचा समावेश आहे. या श्रेणीची किंमत ३२५ रूपयांपासून सुरू होते.