अयोध्येतील राममूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न समारंभासाठी ठाणे शहरातील तलावपाळी परिसर सज्ज झाला आहे हेच या झगमगत्या रोषणाईने सिद्ध झाला असल्याचे दिसत आहे.
कौसल्येचा राम असला तरी अतीव श्रद्धेने तो राम आता आमजनतेचा झाल्याचेच ठाणे शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध समारंभातून दर्शवण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील समिती करत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या ठाण्यातील सहकाऱ्यांनी येते काही दिवस शहरात महाआरती आयोजित केली आहे. प्रभुरामावरील भक्तीप्रमाणेच मतदाररामाचीही काळजी घेत असल्याची जाणीव कुठेतरी होत आहे.
ठीकच आहे, इतकी वर्ष रामनाम घेण्यास अलिखित मनाई होती. त्याचे उट्टे ही सर्वमंडळी सव्याज भरून काढत असल्याचेच वाटत आहे. जय सियाराम!