Friday, December 13, 2024
Homeएनसर्कलअमृत मोहिमेअंतर्गत "जल दिवाळी"...

अमृत मोहिमेअंतर्गत “जल दिवाळी” अभियान संपन्न!

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) अमृत (अटल मिशन फॉर रिजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन,AMRUT) या मोहिमेअंतर्गत मंत्रालयाच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (दीनदयाळ अंत्योदय योजना,NULM), यांच्या सहकार्याने “स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया, या प्रगतीशील उपक्रम नुकताच ओदिशात संपन्न झाला.

जलप्रशासनात महिलांचा समावेश करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. यावेळी महिलांना त्या रहात असलेल्या शहरांमधील जल प्रक्रिया प्रकल्पांना (WTPs) भेटी देऊन जलशुद्धीकरण प्रक्रियेची प्राथमिक माहिती दिली गेली. नागरिकांना उत्तम दर्जाचे पाणी मिळेल याची खात्री देणाऱ्या  स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या महत्त्वाच्या प्रक्रियेची माहिती या भेटींमधून महिलांना दिली गेली. याव्यतिरिक्त, महिलांना पाणी गुणवत्ता चाचणीच्या प्रक्रियेची माहिती देखील मिळेल.पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्ये स्वमालकी आणि  स्वत्वाची भावना निर्माण करणे हे या मोहिमेचे प्रमुख आणि व्यापक उद्दिष्ट आहे.

भारतात 65,000 MLD पेक्षा जास्त जल प्रक्रिया क्षमता असलेले रचनात्मक आणि 55,000 MLD पेक्षा जास्त कार्यक्षम असलेले 3,000 पेक्षा जास्त जलशुद्धीकरण प्रक्रिया क्षमता प्रकल्प आहेत. या मोहिमेदरम्यान, महिला बचत गट (SHGs) 20,000 MLD पेक्षा जास्त (देशातील एकूण 35% पेक्षा जास्त) क्षमता असलेल्या 550 हून अधिक जलशुद्धीकरण प्रकल्पांना भेट देतील.

घरातील पाणी व्यवस्थापनात महिलांचा महत्वपूर्ण वाटा असतो. महिलांना जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांबद्दलचे ज्ञान देऊन त्यांचे सक्षमीकरण करून, घरांसाठी सुरक्षित आणि शुद्ध पाणी मिळवणे सुनिश्चित करण्यासाठी त्यांची क्षमता वाढवणे हे मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुरुषांचे पारंपारिक वर्चस्व असलेल्या सर्वच क्षेत्रांमध्ये समावेशकता आणि विविधतेला प्रोत्साहन देऊन लिंगभाव समानतेच्या समस्यांचे निराकरण करणे आहे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

“स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया “हे अभियान”, “जल दिवाळी” या उपक्रमांच्या पहिला टप्प्यात सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील (प्रारुप आचारसंहितेतील 5 राज्ये वगळता) 15,000 पेक्षा जास्त स्वमदत गटातील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.

देशभरात मोहिमेने निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये या पुढील बाबी समाविष्ट आहेत:

1.महिलांना जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणी गुणवत्ता चाचणी या सुविधांच्या कामकाजाची ओळख करून देणे‌

2.महिला बचत गटांच्या कार्याच्या समावेषकतेला आणि सहभागाला पुरस्कार आणि लेखांद्वारे प्रोत्साहन देणे.

3.अमृत (AMRUT) योजना आणि त्याचा पाण्याच्या पायाभूत सुविधांवर होणारा परिणाम याविषयी महिलांना परिचित करून त्यांना शिक्षित करणे.

जलप्रक्रियेच्या, हक्कांची आणि जबाबदारीची जाणीव, सर्वसमावेशकतेला चालना, स्वयंसहाय्यता गटांचे सक्षमीकरण, सकारात्मक समुदाय प्रभाव आणि भविष्यातील उपक्रमांचे प्रारुप याविषयी जागरूकता आणि ज्ञान वाढवणे यांचा समावेश या मोहिमेच्या यशस्वीततेच्या अपेक्षित उद्दिष्टांमध्ये होतो.

अमृत आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका विभागांतील राज्य आणि शहरांतील अधिकारी हे जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या या भेटींची व्यवस्था करतील. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने पाण्याच्या संदर्भातील मूलभूत सुविधांसाठी महत्त्वाच्या बाबींमध्ये महिलांचा समावेश करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या या उपक्रमात सर्व राज्य आणि शहरातील अधिकार्‍यांना सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि समर्थन देण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे. 

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content