Homeन्यूज ॲट अ ग्लांसयुद्धबंदीमुळे इस्रायलने टाळले...

युद्धबंदीमुळे इस्रायलने टाळले रोजचे 17 अब्ज रुपयांचे नुकसान!

इस्त्रायल-इराण युद्धात आतापर्यंत इराणला मोठं मानवी आणि आर्थिक नुकसान झालं आहे. इराणच्या सरकारी आकडेवारीनुसार 430 नागरिक मृत तर 3,000 जखमी आहेत. एका स्वतंत्र संस्थेनुसार एकूण 722 मृत असून त्यात 200 लष्करी जवान, अधिकारी आहेत. दुसरीकडे, मानवहानी कमी झाली असली तरी इस्त्रायलमध्ये आर्थिक नुकसान मोठं आहे. युद्धात दररोज सुमारे 207 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजे साधारण 17.32 अब्ज रुपये खर्च होत आहे. इमारतींच्या नुकसानीचा आकडा 400 मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. शिवाय, डिफेन्स सिस्टीमवर ताण आला आहे. युद्धबंदीमुळे या दोन्ही राष्ट्रांना आता काहीशी उसंत मिळाली आहे.

इराणमध्ये बिकट आर्थिक संकट, डॉलर तुटवड्याची भीती

दोन्ही देशांनी केलेल्या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांमुळे दोन्ही देशांत नागरी व लष्करी ठिकाणांना मोठं नुकसान झालंय. इराणचा रोजचा थेट युद्धखर्च नेमका जाहीर केला गेला नाही. पण सध्याच्या हल्ल्यांमुळे त्यांची तेलनिर्यात जवळपास अर्ध्यावर आली आहे आणि रोज लाखो डॉलरचं नुकसान होतंय. त्यांची अर्थव्यवस्था आधीच 32% महागाई, 33 अब्ज डॉलर्सचं मर्यादित विदेशी चलन आणि कडक निर्बंधामुळे कमकुवत आहे. युद्ध लांबल्यास इराणच्या अर्थव्यवस्थेवला प्रचंड फटका बसेल. सरकारी खर्च, वेतन, आयात, सगळ्याच गोष्टींवर ताण येईल. इराणकडे सध्या असलेला 33 अब्ज डॉलर्सचा विदेशी चलनसाठा, आयात आणि युद्धखर्चासाठी अपुरा पडू शकतो. जर ही परिस्थिती चालू राहिली, तर इराणला बिकट आर्थिक संकट आणि डॉलरच्या तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो. हे जाणूनच त्यांनी युद्धबंदीच्या प्रस्तावाला होकार दिला.

युद्धबंदी

इस्त्रायलची अर्थव्यवस्था इराणपेक्षा मजबूत

दुसरीकडे, इस्त्रायलची अर्थव्यवस्था मोठी आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे. GDP सुमारे 490 अब्ज डॉलर्स आहे. पण युद्धामुळे तणाव वाढलाय. युद्धखर्चामुळे 2025मध्ये 12% GDP एवढं नुकसान, बजेट तुटीचं प्रमाण 7.5% आणि कर्जाचा भार 70%पर्यंत वाढलाय. सरकारी खर्च वाढल्यामुळे सार्वजनिक वेतनकपात झाली आहे. युद्ध असेच चालू राहिल्यास इस्त्रायलच्या अर्थव्यवस्थेवरही आणखी ताण येऊ शकतो. पण इस्त्रायलची अर्थव्यवस्था अजूनही इराणपेक्षा मजबूत आहे. युद्धामुळे इस्त्रायलच्या तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक कमी झाली आहे आणि काही स्टार्टअप्स बंद पडले आहेत. 15% टेक वर्कफोर्स रिझर्व्हमध्ये गेली, 49% स्टार्टअप्सना गुंतवणूक रद्द झाली आणि नवीन स्टार्टअप्सची संख्या घटली. रोजगारावरही परिणाम झाला. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना तात्पुरती रजा दिली. बेरोजगारी दर 6% पर्यंत वाढला आहे. तरीही काही मोठ्या कंपन्या आणि गुंतवणूकदार टिकून आहेत. पण दीर्घकालीन तंत्रज्ञानक्षमता आणि सरकारी मदतीमुळे इस्त्रायलला लवकर सावरता येईल.

इराणच्या तरुणाईत बेरोजगारीचा विस्फोट

इराणमध्ये सध्या बेरोजगारी दर सुमारे 7.8% आहे. पण 20-24 वयोगटातील तरुणांमध्ये हा दर तब्बल 23% आणि तरुण महिलांमध्ये 35%पर्यंत आहे. युद्धामुळे गुंतवणूकदार मागे हटले; अनेक स्टार्टअप्सना निधी मिळणं कठीण झालंय. गुंतवणूकदारांचा ओघ कमी, इंटरनेटबंदी, सरकारी नियंत्रण आणि ब्रेन ड्रेन यामुळे अनेक स्टार्टअप्स अडचणीत आहेत. तरीही Snapp, Alibaba.ir, Flightio यासारख्या काही मोठ्या कंपन्या यशस्वीपणे सुरू आहेत. आगामी काळात सरकारी पातळीवर काही सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे स्टार्टअप्ससाठी संधी वाढू शकतात. पण सध्यातरी आव्हाने मोठी आहेत.

Continue reading

सीएसटीएमला उभा राहणार छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. युनेस्कोने शिवाजी महाराजांच्या देशातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन दिले असून त्यात महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश आहे, अशी...

प्रवाशांना जगात सर्वात जलद बॅगा मिळणार नवी मुंबई विमानतळावर

महाराष्ट्रातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या सप्टेंबर महिन्यात पहिले विमान उडण्याची शक्यता असून याच विमानतळावर जगातली सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली निर्माण होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली विकसित करण्यात यावी आणि हे या...

महाराष्ट्रात तयार होतोय देशातला सर्वात लांब बोगदा!

मुंबई-पुणे प्रवासाला गती देणारा यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्ग नजीकच्या काळात अधिक गतीमान होणार आहे. या मार्गावरील घाटाचा पट्टा टाळणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातला एक चमत्कार आहे. या प्रकल्पातला एक बोगदा देशातला सर्वात लांब बोगदा असून याच प्रकल्पात देशातला सर्वात उंच...
Skip to content