Sunday, April 27, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईट'ॲडव्हांटेज स्वीट'वरील भारतीय...

‘ॲडव्हांटेज स्वीट’वरील भारतीय खलाशी सुखरूप परतले मायदेशी!

ओमानच्या आखातात ताब्यात घेण्यात आलेल्या ॲडव्हांटेज स्वीट’ (मार्शल आयलंड फ्लॅग) या जहाजावरील सर्व 23 भारतीय खलाशांना इराणमधून नुकतेच सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालय, इराणमधील भारतीय दूतावास, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय यांनी सातत्याने  केलेल्या प्रयत्नांमुळे आणि इराण सरकारच्या सहकार्याने हे साध्य झाले आहे.

आपल्या भारतीय खलाशांचे जीवन आणि स्वातंत्र्य जेव्हा धोक्यात असते, त्यावेळी,’बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय’ त्यांचे कल्याण आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी समर्पित असते, असे जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित परतल्यानंतर केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले. भविष्यात देखील, जेव्हा आवश्यक असेल, तेव्हा अशीच मदत करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बचाव मोहिमेने सरकारी यंत्रणांच्या समर्पणाचे आणि वचनबद्धतेचेही एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे.

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content