Homeचिट चॅट'ऑस्ट्राहिंद-23' संयुक्त लष्करी...

‘ऑस्ट्राहिंद-23’ संयुक्त लष्करी सरावासाठी रवाना!

ऑस्ट्रेलियाबरोबर संयुक्त लष्करी सराव करण्यासाठी – “ऑस्ट्राहिंद-23” (AUSTRAHIND-23) ही 81 जवानांचा समावेश असलेली भारतीय सशस्त्र दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला नुकतीच रवाना झाली. उभय देशांमध्‍ये सरावाची आता दुसऱ्या फेरी होणार आहे. हा सराव कार्यक्रम कालपासून सुरू झाला असून तो 06 डिसेंबर 2023पर्यंत ऑस्ट्रेलियातील पर्थ, येथे होणार आहे.

ऑस्ट्राहिंद या संयुक्त सरावाला 2022 मध्ये सुरूवात झाली आणि पहिली फेरी महाजन, राजस्थान येथे आयोजित करण्यात आली होती. हा वार्षिक प्रशिक्षण सराव उपक्रम असून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दर वर्षाआड अनुक्रमे करण्याचे नियोजित केलेले आहे.

या सरावाचा उद्देश सहयोगात्मक भागीदारी वाढवणे आणि दोन्ही बाजूंमधील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण (सामायिक) करणे हा आहे.

या संयुक्त सरावामुळे विचारांच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन मिळेल आणि सामरिक कारवायांसाठी रणनीती, तंत्र आणि कार्यपद्धती यांचा संयुक्तपणे अभ्यास होईल. या प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये ‘स्निपर’ गोळीबार, आणि परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी संयुक्तपणे पाळत ठेवणे तसेच संप्रेषण उपकरणे चालवणे समाविष्ट आहे. कंपनी/बटालियन स्तरावर रणनीतीच्या कृतींसोबतच अपघाताचे व्यवस्थापन आणि त्यातून बाहेर येण्यासाठी कराव्या लागणा-या प्रयत्नांची तालीमही केली जाईल.

या सरावामुळे दोन्ही लष्करांमधील सामंजस्य वाढण्यास आणि दोन्ही राष्ट्रांमधील मैत्रीपूर्ण संरक्षण सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होईल.

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content