Homeहेल्थ इज वेल्थचीनमधल्या श्वसनाच्या आजारापासून...

चीनमधल्या श्वसनाच्या आजारापासून भारताला कमी धोका!

केंद्रीय आरोग्य मंत्रालय उत्तर चीनमधील H9N2 चा प्रादुर्भाव आणि मुलांमधील वाढत्या श्वसन आजाराच्या प्रकरणांवर बारीक लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये आढळललेले एव्हीयन इन्फ्लूएन्झा प्रकरण तसेच श्वसनाच्या आजारापासून भारताला कमी धोका आहे.

काही माध्यमांच्या वृत्तात उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराच्या वाढत्या संख्येचा उल्लेख आहे आणि याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक निवेदनदेखील जारी केले आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये  श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.,

चीनमध्ये ऑक्टोबर 2023मध्ये H9N2 (एव्हियन इन्फ्लूएन्झा विषाणू)चा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचे आढळून आल्यानंतर  देशात एव्हीयन इन्फ्लूएंझाच्या मानवी प्रकरणांविरूद्धच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती ज्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला होता. आरोग्य संघटनेने केलेल्या  एकूण जोखीम मूल्यमापनात  त्यांच्याकडे आतापर्यंत नोंदवलेल्या H9N2 च्या मानवी प्रकरणांमध्ये मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्याकडे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असून मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे.

भारत कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य संकटाची स्थिती हाताळण्यासाठी तयार आहे. अशा सार्वजनिक आरोग्य समस्यांचा सामना करण्यासाठी समग्र आणि एकात्मिक कृती आराखडा स्वीकारण्यासाठी भारत एक आरोग्य दृष्टीकोनाच्या वाटेवर मार्गक्रमण करत आहे.

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content