Homeटॉप स्टोरीआयकर विभागाचे मुंबईत...

आयकर विभागाचे मुंबईत 29 ठिकाणी छापे!

आयकर विभागाने मुंबईतील प्रमुख बांधकाम व्यावसायिक आणि विकासक समूहप्रकरणी 17 मार्च रोजी छापे घातले. मोबाईल अ‍ॅक्सेसरीजच्या व्यापारात सहभागी असलेल्या डीलर्सच्या प्रकरणीही छापे टाकण्यात आले. मुंबईत एकूण 29 ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली, तर 14 ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले.

बांधकाम क्षेत्रातील हा समूह एक व्यावसायिक मॉल विकसित करत आहे, ज्यामध्ये केवळ मोबाइल उपकरणाच्या व्यवसायासाठी 950 गाळे आहेत. त्यापैकी 2017पासून आतापर्यंत सुमारे 905 गाळ्यांची विक्री झाली आहे. छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणी सापडलेल्या पेनड्राईव्हमध्ये स्टोअर पुराव्यांवरून या समुहाने कराराच्या मूल्यापेक्षा 150 कोटी रुपये जास्तीचे घेतले असून त्याचा हिशेब अशा गाळ्यांच्या विक्रीसंबंधी लेखा पुस्तकात दिलेला नाही. तसेच याच प्रकारचा 70 कोटी रुपये स्वीकारल्याचा पुरावा निवासी-कम व्यावसायिक  प्रकल्पाशी संबंधित पेनड्राईव्हमध्ये सापडला आहे. या बांधकाम व्यावसायिकाने विविध प्रकल्पांमध्ये दुकाने/ फ्लॅट्स यांची विक्री करून घेतलेल्या रक्कमेच्या डिजिटल पावत्यादेखील जप्त करण्यात आल्या.

मोबाईल साहित्याच्या व्यवसायात सहभाग असलेल्या डीलर्स संदर्भात, अनियमित  विक्रीसंबंधित विविध गुन्हेगारी स्वरूपाचे पुरावे सापडले आहेत. हा समूह चीनमधून वस्तूंची आयात करतो आणि हा माल पूर्ण देशभर विकतो. आयात केलेल्या वस्तूंची पावती असते आणि पैसे देताना हवालामार्गे दिले जातात. आयकर अधिकाऱ्यांना बेहिशेबी साठा असलेली 13 गुप्त गोदामे सापडली आहेत, त्यातील साठा मोजण्यात येत असून त्याचे मूल्यांकन सुरू  आहे.

या डीलर्सनी मालमत्तांमध्ये 40.5 कोटीं रुपयांची बेहिशेबी गुंतवणूक केल्याचा पुरावा हाती लागला आहे. यापैकी 21 कोटींची बेहिशेबी गुंतवणूक व्यावसायिक  मॉलमधील गाळे खरेदीसाठी आहे. कर्मचार्‍यांच्या नावे असलेली चार अघोषित बँक खातीही सापडली आहेत, ज्याचा वापर समूहाच्या किरकोळ विक्रेत्यांकडून विक्रीतून मिळणारी रक्कम जमा करण्यासाठी केला जात होता. बँक खात्यात एकूण जमा रक्कम 80 कोटी रुपये इतकी आहे.

या कारवाईत असे दिसून आले आहे की मोबाईल अ‍ॅक्सेसरीजच्या व्यापाराचे संपूर्ण क्षेत्र मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी आहे. मुख्य घटक चीनमधून मुंबई व चेन्नई बंदरामध्ये आयात केले जातात. डीलर्स प्रामुख्याने विक्री आणि खरेदी कमी दाखवत  आहेत. चिनी लोकांसोबतचे व्यवहार वुई-चॅट अ‍ॅपद्वारे होतात. विभागाने फॉरेन्सिकचा वापर करून वुई-चॅट मेसेजेस परत मिळवले आहेत. चीनी आयातीचे प्रमाण व मूल्य या संदर्भातील माहितीची पडताळणी केली जात आहे.

या कारवाईत 5.89 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या शोधकार्यादरम्यान 270 कोटींच्या अघोषित उत्पन्नाचा शोध लागला आहे. पुढील तपास आणि बेहिशेबी स्टॉकचे मूल्यांकन करण्याचे काम चालू आहे.

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

दिल्ली विधानसभा परिसरात मुखवटाधारी व्यक्तीकडून सुरक्षेची ऐसीतैशी

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा संकुलात सोमवारी दुपारी सुरक्षेचा मोठा भंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एका मुखवटाधारी व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या 'टाटा सफारी' कारने विधानसभेचे लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर पुष्पगुच्छ ठेवला...

माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे!

माझा एकच बाप - बाळासाहेब ठाकरे! आम्ही "मार्मिक"मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण "मार्मिक"मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!

देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि...
Skip to content