आशियातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा चार दिवसीय आकर्षक कार्यक्रम “विंग्ज इंडिया 24” काल हैदराबादमध्ये सुरू झाला. वाणिज्यिक, सामान्य आणि व्यावसायिक विमान वाहतुकीचा विस्तार दर्शवणाऱ्या या कार्यक्रमाची संकल्पना आहे- “अमृत काळात भारताला जगाशी जोडणे: भारतीय नागरी विमान वाहतूक @2047 साठी ध्येयनिश्चिती”. हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावर आयोजित जागतिक विमान वाहतूक शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राचा प्रारंभ केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी केला.
“वसुधैव कुटुंबकुम” चे तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने नागरी विमान वाहतुकीच्या उद्दिष्टांचे प्रतीक आहे जे सर्वसामान्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न साकारताना जगाला एक कुटूंब म्हणून जोडत आहे असे कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ज्योतिरादित्य एम सिंधिया म्हणाले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, विमान वाहतूक क्षेत्र हे आर्थिक विकासाच्या प्रमुख चालकांपैकी एक आहे आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये त्याची वाढ अविश्वसनीय आहे. विमान वाहतूक अर्थव्यवस्था महत्त्वपूर्ण आर्थिक आणि सामाजिक फायदे प्रदान करते कारण ती पर्यटन, व्यापार, कनेक्टिव्हिटी सुलभ करते, आर्थिक वाढ निर्माण करते, रोजगार देते आणि दुर्गम समुदायांसाठी जीवनरेखा प्रदान करते आणि अभूतपूर्व परिस्थितीत जलद प्रतिसाद सक्षम करते. भारतीय विमान वाहतूक क्षेत्र 3 एचे प्रतीक आहे: ऍक्सेसिबिलीटी, ऍव्हेलेबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी म्हणजेच सुलभता, उपलब्धता आणि किफायतशीरपणा.
विंग्ज इंडिया 2024 मध्ये आज सात प्रमुख घोषणा करण्यात आल्या.
- फिक्की आणि केपीएमजीद्वारे नागरी विमान वाहतुकीवरील संयुक्त नॉलेज पेपरचे प्रकाशन
- उडान 5.3 चे उद्घाटन
- एअरबस-एअर इंडिया प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ, अधिक विमाने खरेदी करून आणि येत्या काही वर्षांत 10 फ्लाइट सिम्युलेटर आणि 10,000 वैमानिकांना प्रशिक्षित करण्यासाठी गुरुग्राममध्ये उड्डाण प्रशिक्षण केंद्राची स्थापना.
- अधिक वैमानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी टाटा एएसएल आणि महिंद्रा एरोस्पेस स्ट्रक्चर्स प्रा. लि.सोबत एअरबस उत्पादन करार.
- जीएमआर आणि इंडिगो ने एरोस्पेस उद्योगात शाश्वत प्रशिक्षण विकसित करण्यासाठी एकाधिक पॅटर्नसह सहयोग करण्यासाठी एक कन्सोर्टियमवर स्वाक्षरी.
- जीएमआर स्कूल ऑफ एव्हिएशनचे उद्घाटन.
- 17 महिन्यांच्या कालावधीत 200 विमानांच्या तिप्पट ऑर्डरसह अकासा एअरची कराराची घोषणा.