Sunday, April 27, 2025
Homeटॉप स्टोरीगतवर्षी भारतात झाले...

गतवर्षी भारतात झाले 4,61,312 रस्ते अपघात!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘भारतातील रस्ते अपघात-2022’ संबंधी वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, 2022 या वर्षात देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांत एकूण 4,61,312 रस्ते अपघात झाले आणि त्यामध्ये 1,68,491 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 4,43,366 जण जखमी झाले. आधीच्या पंचांग वर्षातील आकडेवारीशी तुलना करता, या अहवालानुसार 2022 या वर्षी अपघातात 11.9%, मृत्युंमध्ये 9.4% तर जखमींच्या प्रमाणात 15.3% वाढ झाली आहे.

हा अहवाल आशिया पॅसिफिक रस्ते अपघातविषयक माहिती (एपीआरएडी) आधारित प्रकल्पांतर्गत संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाने आशिया तसेच पॅसिफिक (युएनईएससीएपी) प्रदेशासाठी निर्धारित केलेल्या प्रमाणित स्वरुपात पंचांग वर्षात राज्ये तसेच केंद्रशासित प्रशासने यांच्या पोलीस विभागाकडून प्राप्त आकडेवारी/माहितीवर आधारित आहे.

या अपघातांना कारणीभूत असणाऱ्या, अतिवेगाने वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे तसेच वाहतूकविषयक नियमांचे पालन न करणे यांसह अनेक घटकांचे निरसन करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारण्याची तातडी अधोरेखित होत आहे. त्यासाठी आपण अंमलबजावणी यंत्रणा मजबूत करणे, चालकांचे शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम अधिक प्रमाणात राबवणे तसेच रस्ते आणि वाहनांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करणे अशा उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सशक्त उपाययोजना राबवण्याप्रती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कटिबद्ध आहे. रस्त्यांचा वापर करणाऱ्यांची वर्तणूक, रस्त्यांच्या पायाभूत सुविधा, वाहनांचे मापदंड, वाहतूक नियमांची अंमलबजावणी तसेच अपघातांना प्रतिबंध करण्यात तंत्रज्ञानाची भूमिका अशा विविध पैलूंवर देखील मंत्रालय काम करत आहे. रस्ते अपघातांचे स्वरूप बहु-नैमित्तिक असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोघांच्याही अखत्यारीतील सर्व संस्थांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून अशा समस्या सोडवण्यासाठी बहु आयामी दृष्टीकोनाची गरज आहे. केंद्रीय मंत्रालयाने इतर विविध संबंधित संघटना तसेच भागधारक यांच्या सहकार्याने शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते तसेच वाहने अशा दोन्हींची), अंमलबजावणी तसेच आपत्कालीन सेवा या चार घटकांवर लक्ष केंद्रित करून  रस्ते सुरक्षेची समस्या सोडवण्यासाठी बहुआयामी धोरण तयार केले आहे.

त्याशिवाय, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आधुनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते सुरक्षाविषयक लेखापरीक्षण आणि या विषयासंदर्भात जगात प्रचलित सर्वोत्तम पद्धती शिकण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सहयोगी संबंधांची स्थापना यांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रियतेने सहभागी होत आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी वास्तव वेळात माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अपघातविषयक तपशीलवार इलेक्ट्रॉनिक अहवाल (ई-डीएआर) आणि स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांची उभारणी यांसारखे उपक्रमदेखील हाती घेण्यात येत आहेत.

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content