Wednesday, January 15, 2025
Homeकल्चर +सुनिधि चौहानच्या ‘मन...

सुनिधि चौहानच्या ‘मन हे गुंतले..’ला भरभरून प्रतिसाद!

नुकताच आलेल्या “आटा पिटा” गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी गायिका सुनिधि चौहान हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील गाणं ‘मन हे गुंतले’ २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. गाणं रसिकांच्या मनावर हळवा प्रभाव पाडत असून गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातून अविश्वसनीय प्रतिसाद येत आहे.

‘मन हे गुंतले’ गाणं सुनिधि चौहान यांनी गायलं असून गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे आणि शिवम बरपंडे यांनी लिहिलं आहे. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून संदीप मनोहर नवरे यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी प्रमुख भूमिकेत दिसणार असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे सुप्रसिद्ध अभिनेते झळकणार आहेत.

संगीत म्हटलं की मन अगदी उल्हासित होऊन जातं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकाच्या मनाला उल्हासित करण्यासाठी सुनिधि चौहान हिच्या सुरेल आवाजातलं गाणं सादर करत असताना आमचा आनंद गगनात न मावणारा आहे. असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content