Homeटॉप स्टोरीदावोसमार्फत पोलाद, आयटी, हरित उर्जा, कृषी...

दावोसमार्फत पोलाद, आयटी, हरित उर्जा, कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून आज ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमांतून दिली. याव्यतिरिक्त १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. या करारांमुळे राज्यात २ लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती होणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक वाढ

हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत, असे सांगतानाच उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे याठिकाणी जाणवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १६ तारखेस ६ उद्योगांसमवेत १ लाख २ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. त्यातून २६ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. १७ जानेवारीस ८ उद्योगांशी २ लाख ८ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून १ लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. आज ६ उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

गुंतवणूक करार झालेल्या उद्योगांची माहिती व रोजगार पुढीलप्रमाणे:

१६ जानेवारी– आयनॉक्स एअर प्रोडक्ट २५ हजार कोटी (५ हजार रोजगार), बी सी जिंदाल ४१ हजार कोटी (५ हजार रोजगार), जेएसडब्ल्यू स्टील २५ हजार कोटी (१५ हजार रोजगार), एबी इन बेव्ह ६०० कोटी (१५० रोजगार), गोदरेज एग्रोव्हेट १००० कोटी (६५० रोजगार) अमेरिकास्थित डेटा कंपनी १० हजार कोटी (२०० रोजगार).

१७ जानेवारी– अदानी ग्रुप ५० हजार कोटी (५०० रोजगार), स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ११५८ कोटी (५०० रोजगार), इंडियन ज्वेलरी पार्क ५० हजार कोटी (१ लाख रोजगार), वेब वर्क्स ५ हजार कोटी (१०० रोजगार), लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस, इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून ३५०० कोटी (१५ हजार रोजगार), नैसर्गिक संसाधनातील कॉन्गलोमिरेट कंपनी २० हजार कोटी (४ हजार रोजगार).

महाप्रीतने हरित उर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचे करार केले. ते पुढीलप्रमाणे..

अमेरिकास्थित प्रेडीक्शन्ससमवेत ४ हजार कोटी, युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जी मध्ये ८ हजार कोटी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जी ३००० मध्ये ४० हजार कोटी, व्हीएचएम ओमान समवेत ४ हजार कोटी.

आज पुढील सामंजस्य करार होतील- सुरजागड इस्पात १० हजार कोटी (५ हजार रोजगार), कालिका स्टील ९०० कोटी (८०० रोजगार), मिलियन स्टील २५० कोटी (३०० रोजगार), ह्युंदाई मोटर्स ७ हजार कोटी (४ हजार रोजगार), कतारची एएलयु टेक समवेत २०७५ कोटी (४०० रोजगार), सीटीआरएल एस ( ctr s) ८६०० कोटी (२५०० रोजगार)

१ लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य

याशिवाय विविध उद्योगांनी १ लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखविले असून यात अर्सेलर निपॉन मित्तल तसेच सौदी, अरब, ओमान येथील उद्योगांचा समावेश आहे.

विविध उद्योग समूहांशी चर्चा यशस्वी

दावोस येथील महाराष्ट्र दालनात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध उद्योग समुहांचे प्रमुख भेटले. त्यामध्ये अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

ज्येष्ठ उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी भविष्यातील गुंतवणकीच्या सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर लिंकस्टाईनचे युवराज यांच्याशीदेखील औद्योगिक गुंतवणुकीबाबत संवाद साधण्यात आला.

फ्रेंच वाणिज्य कंपनी असलेल्या लुईस ड्रेफसचे मुख्य धोरणकर्ते अधिकारी थॉमस कौटॉडियर आणि मुख्य वित्त अधिकारी पॅट्रीक ट्रुअर यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विस्ताराबाबत यावेळी चर्चा झाली.

दक्षिण कोरीयाच्या ग्योग्नी प्रांताचे गव्हर्नर किम डाँग यिओन यांची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट झाली. उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दक्षिण कोरियाचे कौशल्य आणि कुशल मनुष्यबळाच्या क्षेत्रातील भारताची ताकद यांच्यात समन्वय करून या क्षेत्रात महाराष्ट्रात मजबूत पायाभरणी करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

चेक प्रजासत्ताक स्थित विटकोविट्झ अ‍ॅटोमिका कंपनीचे चेअरमन डेव्हीड क्रोबोक यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये छोटे मॉड्युलर अणुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा झाली. या करारांच्या वेळी उद्योगमंत्री उदय सामंतदेखील मुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होते.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content