Homeन्यूज अँड व्ह्यूजकिती भाषा शिकू...

किती भाषा शिकू शकाल तुम्ही?

आफ्रिका हा एक बहुभाषी खंड आहे आणि येथील अनेक प्रौढ माणसे अनेक भाषा अतिशय सफाईदारपणे बोलू शकतात. एका मनो-भाषातज्ञ अभ्यासात असे दिसले की बहुभाषी असण्याची लक्षणे बाल्यावस्थेत शोधायला हवीत. या भाषांचे नियमित वक्ते जसे बोलतील त्याच पद्धतीने ही बालके बोलू शकतात. या भाषा त्यांनी अप्रत्यक्षपणे रेडिओ, टेलिव्हिजन कार्यक्रमातून किंवा जवळच सुरु असलेल्या संभाषणावरून ऐकलेल्या असतात. काही भाषा त्यांचा सांभाळ करण्यातून येतात.

आपल्या मेंदूत ‘दोन भाषा केंद्रे’ असतात आणि हे दोन्ही मेंदूच्या डाव्या भागात असतात असे संशोधनात सिद्ध झाले आहे. यापेकी ब्रोका हा भाग शब्द बोलण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी असतो आणि वेर्निक या दुसऱ्या भागाचे मुख्य काम त्या-त्या भाषेचा अर्थ लावणे असे असते. ही गोष्ट केवळ ज्यांना पाच किंवा अधिक भाषा सफाईदारपणे बोलता येतात त्यांच्या बाबतीत असते. या लोकांना ‘पॉलीग्लॉट’ असे म्हणतात. हे लोक जेव्हा या पाचपैकी एखादी भाषा ऐकतात तेव्हा या भाषेसाठी असलेला मेंदूचा भाग कार्यान्वित होतो. मात्र या माणसाची ही स्थानिक भाषा असेल तर मात्र येथे फारशी कृती घडत नाही असेही एका वेगळ्या संशोधनात आढळले.

पॉटसडॅम येथील प्रा. डॉ. नताली बोल-अवेतीस्यान आणि पॉल ओमाने हे मनोविज्ञान आणि भाषातज्ञ आणि त्यांच्या चमूने बहुभाषिक असण्याची मनातील मुळे कुठे असावीत असा अभ्यास केला तेव्हा त्यांना असे दिसले की, घाना या देशात मुले वाढू लागतात तीच बहुभाषिक म्हणून आणि यापैकी प्रत्येकजण दोन ते सहा भाषा सफाईदारपणे बोलू शकतो. या भाषांचे नियमित

वक्ते जसे बोलतील त्याच पद्धतीने ही बालके बोलू शकतात. या भाषा त्यांनी अप्रत्यक्षपणे रेडिओ, टेलिव्हिजन कार्यक्रमातून किंवा जवळच सुरु असलेल्या संभाषणावरून ऐकलेल्या असतात. काही भाषा त्यांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तींकडून येतात. ’आकलनशक्तीचा विकास’ या विज्ञान नियतकालिकात अलीकडेच हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

घाना देशातील कुटुंबे साधारणपणे आवार असलेल्या इमारतींमध्ये राहतात. अनेक इमारती आणि त्यात राहणारी आणि विविध भाषा बोलणारी माणसे आणि त्यांचे संवाद जेव्हा लहान मुलांच्या कानावर पडतात तेव्हा त्यांच्यामधील नैसर्गिक आकलनशक्तीने मुले या भाषा समजू शकतात आणि बोलू शकतात. या मुलांच्या जीवनाचा हा अविभाज्य भाग असतो. प्रगत देशांमध्ये लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी ‘दाई’ किंवा ‘आया’ असतात आणि या बहुतांशी स्थानिक भाषा बोलणाऱ्या असतात असे मानले जाते. मुले त्यांच्यासोबत राहत असल्यामुळे आपसूकच भाषा शिकू लागतात आणि त्यात प्रगत होत जातात.

लहान मुलांच्या वेगवेगळ्या भाषा शिकण्याबद्दल जे अनेक अभ्यास केले गेले आहेत त्यात असे दिसून आले आहे की, विशेष करून पश्चिमी आणि त्यातही उद्योजक असलेल्या देशांमध्ये साधारणपणे अतिशय संकुचित असे एकाच किंवा फार तर दोन भाषांना प्राधान्य असते. परंतु या नव्या संशोधनात असे आढळले आहे की, इतर समाजदेखील आपापल्या वसाहतीत बहुभाषिक वातावरण निर्माण करू शकतात आणि यातून येथील कुटुंबांचा फायदा होतो. लक्षात आलेली आणखी एक वेगळी बाब म्हणजे इंग्रजी ही भाषा प्राथमिकतेने परंतु अप्रत्यक्ष रीतीने शासकीय संवाद, बातम्या अथवा तत्सम कार्यक्रमातून मिळते आणि तिचा वापरदेखील मुले करतात. परंतु घरात मात्र ही मुले आवारातील काही भाषांचाही उपयोग करताना दिसतात. त्यामुळे बहुभाषिकत्व येते आणि अशा उपयोगातून ते तपासलेही जात असल्याने त्याला बोलाचालीची भाषासिद्धी प्राप्त होते…

Continue reading

दोन बापांच्या उंदराला पिल्ले…

या जगातले विज्ञान आजचे कोणतेही आश्चर्य प्रत्यक्षात घडवून आणते, हे जरी खरे असले तरी ‘दोन बापांचा’ ही मराठीत चक्क शिवी समजली जात असताना माणसाच्या दीर्घायुषी जीवनासाठी जे काही संशोधन होत आहे त्यासाठी उंदीर हाच प्राणी वापरला जातो. याचेही कारण...

आता अवकाशात भ्रमण करणार माणसाच्या अस्थी!

माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो की, माझे जेव्हा केव्हा बरेवाईट होईल त्यानंतर तुम्ही माझ्यावर अंत्यसंस्कार तर करालच, पण मी आजच्या...

आता होणार खग्रास सूर्यग्रहणही कृत्रिम!

काय काय कृत्रिम होणार कुणास ठाऊक? बुद्धिमत्ता कृत्रिम झाली. माणसेही कृत्रिम रीतीने तयार होण्याची सुरुवात झाली आहे... आता विज्ञानाचा रोख थेट सूर्यापर्यंत पोहोचला आहे. “सूर्यग्रहणाची वाट कशाला बघायची? आम्ही विज्ञानाची करामत करून केवळ दोन उपग्रह अवकाशात सोडणार आणि सूर्यग्रहण होईल......
Skip to content