मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने हौशी कलाकारांसाठी हार्मोनियम वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १० डिसेंबर २०२३ या दिवशी १७ ते २५ वर्षे वयोगटासाठी तर १६ डिसेंबर २०१३ या दिवशी १० ते १६ वयोगटात ही स्पर्धा होईल.
स्पर्धा सकाळी ९ वाजता संस्थेच्या सभागृहात होतील. स्पर्धेचे अर्ज संस्थेच्या फेसबुक, ट्विटरवर तसेच www.dadar matungaculturalcentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क २४३०४१५०.