Friday, November 22, 2024
Homeकल्चर +दाक्षिणात्य व्यक्तिरेखा साकारणार...

दाक्षिणात्य व्यक्तिरेखा साकारणार हार्दिक!


सध्या जोरदार चर्चेत असलेला, आगरी-कोळी भाषेचा जलवा दाखवणारा, ॲक्शनपटू ‘बाबू’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अंकित मोहनच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या चित्रपटातील एक सरप्राईस समोर आला आहे. या दाक्षिणात्य चित्रपटात रांगड्या राणाच्या महत्वपूर्ण भूमिकेत हा अभिनेता हार्दिक दिसणार आहे. हार्दिक या चित्रपटात प्रथमच नकारात्मक भूमिकेत आहे.

आपल्या या व्यक्तिरेखेबद्दल हार्दिक जोशी म्हणतो की, वेगळ्या धाटणीची ही व्यक्तिरेखा असून प्रथमच मी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. नेहमीच वेगवगळ्या भूमिका साकारण्याकडे माझा कल असतो. या भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. खूप छान वाटतेय, प्रेक्षक अशा भूमिकांमध्येही मला स्वीकारत आहेत, याचा विशेष आनंद आहे. सध्या माझ्या ‘बाबू’मधील व्यक्तिरेखेबाबत चित्रपटातही गोपनीयता आहे. मात्र हे रहस्य दुसऱ्या भागात उलगडणार असून ते जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहवी लागणार आहे. तर, दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात की, हार्दिकचे व्यक्तिमत्व भारदस्त आहे. त्यामुळे या भूमिकेत तो चपखल बसतो. अतिशय उत्तमरित्या त्याने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘बाबू’मध्ये आणखीही बरीच रहस्ये आहेत. जी दुसऱ्या भागात समोर येतील.

समर्थ कृपा प्रॉडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content