Sunday, November 24, 2024
Homeकल्चर +गुलजार, पं. जयपूरवाले...

गुलजार, पं. जयपूरवाले आणि सुमित टप्पू यांचा नवीन अल्बम लॉन्च

ज्येष्ठ गीतकार गुलजार, संगीतकार पं. भावदीप जयपूरवाले आणि गायक सुमित टप्पू यांनी त्यांचा नवीन अल्बम “दिल परेशान करता है” मुंबईत नुकताच लाँच केला. यावेळी पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया, माजी कसोटी क्रिकेटपटू सुनील गावसकर, पद्मश्री अनुप जलोटा, गदर दिग्दर्शक अनिल शर्मा, गायक नितीन मुकेश, चंदन दास, घनश्याम वासवानी, श्याम सिंघानिया, ललित पंडित, जेडी मजिठिया, विजय दयाल, आनंद डाबरे, अशोक खोसला, कुणाल गांजावाला यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

सुमित टप्पूचे वडील महेंद्र टप्पू आणि सुमितची पत्नीही ह्या कार्यक्रमात उपस्थित होत्या. रखशिन्दा यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले. अल्बममधल्या दोन गाण्यांचा व्हिडिओ ह्या कार्यक्रमात दाखवण्यात आले. एक गाणे “हमने तुम्हारी याद का मौसम बुला लिया, एक गम बुझा दिया कभी एक गम जला लिया” आहे तर दुसरे गाणे “समंदर” होते जे समुद्रकिनारी चित्रित केले आहे. याप्रसंगी, गुलजार यांचा 90वा वाढदिवसही भव्य केक कापून साजरा करण्यात आला. सुनील गावसकर यांनी गुलजारना शतक पूर्ण करण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले की, मी माझे बेस्टच देण्याचा प्रयत्न करणार.

पद्मश्री अनुप जलोटा म्हणाले की, माझा शिष्य सुमित टप्पू खूप चांगला गायक झाला आहे याचा मला खूप आनंद आहे. गुलजार यांचे गाणे गाणारा प्रत्येक गायक हा खूप लोकप्रिय झाला आहे. सुमितने तर ७ गाणी गायिली आहेत. त्याची लोकप्रियता सगळीकडे पसरेल यात शंकाच नाही. सुमितने अतिशय आत्मविश्वासाने ही गाणी गायली आहेत.

या अल्बममध्ये सात गाणी आहेत, ज्यामध्ये गुलजार यांनी सादर केलेल्या सात वेगवेगळ्या शायरी आहेत. सुमित टप्पू यांच्या सुरेल आणि मंत्रमुग्ध आवाजात ही गीते आहेत. पं. भवदीप जयपूरवाले यांचे म्युझिक अरेंजमेंट्स, लाइव इंस्ट्रूमेंट्स आणि एक सुंदर वायलिन सिम्फनी यांनी सजलेला हा अल्बम चित्रपटेतर संगीत क्षेत्रातील दुर्मिळ आवाज जाणवतो. गुलजार यांची कालातीत आणि सखोल वैचारिक कविता हृदयाला भिडते आणि प्रेम, जीवन आणि तत्त्वज्ञानाच्या सारावर चिंतन दर्शविते. त्यांच्या भावनिक कविता आणि शब्दांच्या खोलीसाठी ओळखले जाणारे, गुलजार यांनी प्रेमापासून आशापर्यंत विविध विषयांवर स्पर्श करणारी गाणी रचली आहेत.

गुलजारच्या चरणांना स्पर्श करून अभिनेते अरुण गोविल म्हणाले की, सुमितने फिजीमध्ये काही कार्यक्रम केले असल्याने त्यांचे आणि सुमितचे चांगले संबंध आहेत. “दिल परेशान करता है” हे टायटल फक्त गुलजारच देऊ शकतात. जेव्हा ते बोलतात तेव्हा असे वाटते की शायरीच करत आहेत. त्यांनी जे लिहिले आहे ते आपण वाचतो, ऐकतो तेव्हा आपल्याला वाटते की ही गोष्ट आजपर्यंत आपल्याला का समजली नाही.

सुमित टप्पू, ज्याला यापूर्वी भारतीय संगीत उद्योगातील योगदानाबद्दल प्रशंसा मिळाली आहे, तो या अल्बमबद्दल खूप उत्सुक आहे. कृतज्ञता व्यक्त करताना तो म्हणाला की, “गुलजार साहेबांसोबत काम करणे हे स्वप्न पूर्ण होण्यापेक्षा कमी नाही. ते साहित्य क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व म्हणून उभे आहेत, जे महान कवी मानले जातात. त्यांचे हृदयस्पर्शी शब्द माझ्या मनात खोलवर गुंजले, माझ्या कवितेचे आकलन आणि कौतुक घडवले. त्यांच्या खोल आणि गुंतागुंतीच्या कवितांना माझा आवाज देण्याची संधी एक व्यावसायिक म्हणून माझ्यासाठी केवळ संस्मरणीय नाही तर शब्दांच्या पलीकडे जाणारा सन्मान आहे.”

सुमित टप्पू यांनी पं. भवदीप जयपूरवाले यांच्या रचना आणि संगीत दिग्दर्शनाचेही कौतुक केले. “अल्बममधील भवदीपजींची रचना आणि संगीत दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. ही सातही गाणी वेगवेगळ्या रगांमध्ये रचलेली आहेत, ज्यात एक अनोखा दृष्टीकोण, शैली आणि संगीत वितरण दिसून येते. मला खात्री आहे की संगीतप्रेमी या अल्बमचे मनापासून कौतुक करतील,” असे ते म्हणाले.

Continue reading

मतदारांनी उधळून लावला शरद पवारांचा भावनिक खेळ!

अखेर पुणेकरांसह महाराष्ट्रातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भावनिक खेळी नाकारत त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिला. या विधानसभा निवडणुकीत बहुतांश ठिकाणी या काका-पुतण्याच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आमनेसामने होते. गेल्या दोन महिन्यांपासून शरद...

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...
Skip to content