Wednesday, January 15, 2025
Homeचिट चॅटरॅपीडो कॅरम सुपर...

रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेची शानदार सुरुवात

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज यांच्या सहयोगाने इंडियन ऑइल आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेचे शानदार उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते नुकतेच झाले.

त्यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ऍपेक्स काऊन्सिल सदस्य अभय हडप, राज्य कॅरम संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र शाह, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सहसचिव केतन चिखले आणि योगेश फणसाळकर, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचे सचिव जयंत पाटील आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक दादर शाखेचे शाखाधिकारी आशिष उपाध्याय उपस्थित होते.

यावेळी अजिंक्य नाईक म्हणाले की, लहानपणी कॅरम खेळात होतो त्यामुळे या खेळाची आवड आहे. एमसीए म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि एमसीए म्हणजे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन त्यामुळे कॅरमला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक वर्षा उपाध्ये यांनी केले. उद्घाटनाला विश्वविजेते संदीप दिवे आणि राष्ट्रीय विजेती काजल कुमारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पुरुष एकेरी सामन्यांनी स्पर्धेला सुरुवात झाली.

पुरुष एकेरी पहिल्या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे

दिलीप सोसा (मुंबई) वि वि शिरीष पेंढारकर (मुंबई उपनगर) २५-४, २५-०

संजय भंडारे (मुंबई उपनगर) वि वि महेश कुपेरकर (मुंबई) १७-४, १६-३

दिलेश खेडेकर (मुंबई) वि वि महम्मद जावेद याकूब खान (ठाणे) १९-४, २५-०

शाबाज नासिर शेख (मुंबई उपनगर) वि वि संजय कोंडविलकर (रत्नागिरी) १८-२, १२-११

अनिल मुंढे (पुणे) वि वि चंद्रकांत तुपलोंढे (मुंबई उपनगर) २२-१, २५-५

मंगेश जागुष्टे (मुंबई) वि वि नासिर खान (मुंबई उपनगर) १३-१४, २०-२, २२-३

नंदू सोनावणे (पुणे) वि वि महेश शेट्ये (ठाणे) २३-७, २५-८

राहुल भस्मे (रत्नागिरी) वि वि राजेश खेडेकर (मुंबई) २४-४, ८-७

रोमित बगाडे (ठाणे) वि वि नीलांश चिपळूणकर १८-६, ११-९

कृष्णा वाघमारे (मुंबई) वि वि रघुनाथ वाघपंजे (मुंबई उपनगर) १८-१३, ११-७

Continue reading

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...

५वी अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आजपासून

मुंबईतल्या स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फौंडेशनच्या विद्यमाने होणाऱ्या ५व्या अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, १३ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १७ जानेवारीला अंतिम लढत होऊन स्पर्धेची सांगता होईल. गतविजेते डॅशिंग स्पोर्ट्स क्लब यांच्यासह ८...

कडाक्याच्या थंडीतही शनिवारी विजेची विक्रमी मागणी

थंडीमुळे हिवाळ्यात विजेची मागणी कमी होत असली तरी यंदा गेल्या शनिवारी, ११ जानेवारीला राज्यात २५,८०८ मेगावॅट इतकी आतापर्यंतच्या विक्रमी विजेची मागणी नोंदविली गेली. मात्र, ग्राहकांची ही मागणी कोणतीही अतिरिक्त वीजखरेदी न करता पूर्ण केली, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा...
Skip to content