महावितरणच्या नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८,५०० रुपये सानुग्रह अनुदान घेण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. महावितरणमध्ये कार्यरत सर्व पदवी/पदविका प्रशिक्षणार्थी अभियंते तसेच लेखा सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक,कनिष्ठ सहाय्यक, विद्युत सहाय्यक आणि वीज सहायक इत्यादी सहाय्यकांना १२,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचाही निर्णय झाला आहे.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रधान सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कामगार संघटनांसोबत केलेल्या चर्चेत हा निर्णय घेण्यात आला.
महावितरण मध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या कालावधित काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल. त्या वर्षात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनीही हा लाभ मिळेल व तो कालावधीवर अवलंबून असेल.