भारतीय पोस्ट खात्याने आणलेय UPI सारखेच दुसरे क्रांतिकारी रेव्होल्यूशन! भारत अधिकृतपणे ॲड्रेसिंगच्या एका नवीन युगात प्रवेश करत आहे! 27 मे 2025पासून, पोस्टाचे अन् आपल्या शहर, विभाग, गावाचे पारंपारिक 6-अंकी पिनकोड हद्दपार करण्याची सुरुवात झाली आहे. त्याची जागा घेतोय दहा अंकी अल्फान्यूमेरिक डिजिटल कोड – डिजीपिन. हा तुमचे अचूक भौगोलिक स्थान निश्चित करतो.
डिजीपिन म्हणजे काय?
डिजीपिन म्हणजे डिजिटल पोस्टल इंडेक्स नंबर – आयआयटी हैदराबाद आणि इस्रोच्या एनआरएससी यांच्या सहकार्याने पोस्ट विभागाने विकसित केलेली ही एक भू-स्थानिक संदर्भप्रणाली आहे. ते का महत्त्वाचे आहे? तर, अचूकतेसाठी. यापुढे नो मोअर पत्त्याची शोधाशोध, नो मोअर याला-त्याला विचारणा. (अर्थात, माझ्या आईला आजही पत्ता विचारत-विचारात इच्छित लोकेशनला जाणे, हेच लाईव्ह वाटते!)
विस्तृत, ब्रॉड झोन कव्हर करणाऱ्या जुन्या पिनकोडपेक्षा डिजीपिन परफेक्ट पत्ते देते. लास्ट माईल डिलिव्हरी त्यामुळे अधिक अचूक अन् गतिमान होईल. स्मार्ट शहरी नियोजनाला दिशा मिळेल. पारंपारिक पोस्टल सिस्टमद्वारे वगळलेल्या ग्रामीण, आदिवासी आणि अतिदुर्गम प्रदेशांनाही स्वतःचा DIGIPIN मिळून परिवर्तन होईल. हा बदल केवळ प्रशासकीय नाही तर डिजिटल राष्ट्रनिर्मितीकडे वाटचाल आहे. वन नेशन वन ॲड्रेस!

कसा असतो डिजीपिन ते जाणून घ्या..
उदा. – जळगावातील ‘ॲग्रोवर्ल्ड’ संस्थेच्या ऑफिसच्या जागेचा डिजीपिन आहे : 3MM-C27-L6L3
शहराचे नाव, पिनकोड वैगेरे काहीही न घालवता नुसता डिजीपिन टाकला तरी युनिव्हर्सल मॅपिंगच्या आधारे कुणीही सहजपणे अक्षांश-रेखांश 21.01040357, 75.55151403 असलेल्या गणेश कॉलनी रोडवरील, ख्वाजामिया चौकातील या लोकेशनला बरोबर पोहोचेल. हे म्हणजे आपण कुठल्याही लोकेशनला GPS लावून मॅपआधारे बरोबर पोहोचतो, अगदी तसेच आहे. GPS लोकेशन म्हणजे तरी काय, तर अक्षांश-रेखांश!
आता वर ॲग्रोवर्ल्डचा जो डिजीपिन आहे, तोच या चौकातील दर्जी क्लासेस किंवा शेजारील SES बीएड कॉलेज किंवा रस्ता ओलांडून समोरच्या रोहिणी स्वीट मार्टचा असेलच असे नाही. कारण, डिजीपिन दर चार मीटर चौरस क्षेत्रापलीकडे बदलतो. ॲग्रोवर्ल्डच्या चार चौरस मीटर ब्लॉकमधील सर्वांचा डिजीपिन मात्र सेम असेल.
पाकिस्तानवर टार्गेट लोकेशन मॅपिंग करून लष्कराने केले होते हल्ले–
गुगल मॅपवरील आपल्या लोकेशनचे प्लस कोड, जिओ कोड असतात ना, अगदी तसेच हे डिजीपिन आहे. अक्षांश-रेखांश यांचे अर्थात, लॉनजीट्यूड अन् लॅटीट्यूड मॅपिंग. अलीकडच्या पाकिस्तानविरोधातील युद्धात भारतीय सैन्याने याच पद्धतीने टार्गेट लोकेशन मॅपिंग करून निशाणा साधला होता.

तुमचा DIGIPIN येथे जाणून घ्या : https://cutt.ly/DIGIPIN-VP
या लिंकला क्लिक करा फक्त, तत्पूर्वी आपले मोबाईल GPS लोकेशन ऑन करून ठेवा. लिंक क्लिक केल्यावर उघडणारे पोस्टाचे पेज तुम्हाला तुम्ही ज्या लोकेशनला आहात त्याचा डिजीपिन दाखवेल.
तुम्ही एखादा डिजीपिन टाकून ते लोकेशन कुठचे हेही सर्च करू शकता किंवा अक्षांश-रेखांश माहिती असतील तर ते टाकून तुम्हाला त्या लोकेशनचा डिजीपिन सर्च करता येऊ शकेल.
हे खूपच किचकट आहे. एव्हढा मोठा DGpin टाकण्यापेक्षा सहा आकडी नंबरच सुटसुटीत नाही का? प्रत्येक जण काही GPS लावत नाही. address लिहिताना DGpin लिहायला कठिणच नाही का?