Thursday, June 13, 2024
Homeटॉप स्टोरीप्रजासत्ताक दिनानिमित्त 1132...

प्रजासत्ताक दिनानिमित्त 1132 जवानांना शौर्य/सेवा पदके जाहीर

आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ,पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. विविध पदकांची सन्मान करण्यासाठीची संपूर्ण पदक व्यवस्था तर्कसंगत करण्यासह त्यात परिवर्तन करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यायाच अनुषंगाने, सोळा शौर्य/सेवा पदके (पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेसाठी) तर्कसंगत करण्यात आली असून  खालील चार पदकांमध्ये विलीन करण्यात आली आहेत.

i). राष्ट्रपती शौर्य पदक (पीएमजी )
II). शौर्य पदक (जीएम )
III). विशिष्ट सेवा राष्ट्रपती पदक (पीएसएम )
VI). उत्कृष्ट सेवा पदक (एमएसएम )

पदकांच्या अलीकडील पुनर्रचनेनंतर, प्रजासत्ताक दिन 2024 निमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील एकूण 1132 कर्मचार्‍यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत.

तपशील खालीलप्रमाणे आहे:- 

शौर्य पदके – पोलीस सेवा

Name of the Medals Number of Medals Awarded
President’s Medal for Gallantry (PMG)02
Medal for Gallantry (GM)275

अनुक्रमे जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी किंवा गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी घेतलेल्या जोखमीचा अंदाज लावत, संबंधित अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांच्या अनुषंगाने दुर्मिळ शौर्य कायदा आणि वैशिष्ट्यपूर्ण शौर्य कायद्याच्या आधारावर राष्ट्रपती शौर्य पदक (पीएमजी ) आणि शौर्य पदक (जीएम ) प्रदान केले जाते. 277 शौर्य पुरस्कारांपैकी बहुसंख्य नक्षलवाद प्रभावित भागातील 119 जवान, जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील 133 जवान आणि अन्य प्रदेशातील 25 जवानांना त्यांच्या शौर्यासाठी सन्मानित केले जात आहे.

शौर्य पदके प्राप्त करणार्‍या जवानांमध्ये, बुटेम्बो येथील मोरोक्कन रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियन (एमओआरआरडीबी) छावणीमधील बीएसएफच्या 15व्या काँगो तुकडीचे सदस्य म्हणून, काँगो लोकशाही प्रजासत्ताकमध्ये (एमओएनयुएसीओ) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थिरीकरण अभियानाचा एक भाग म्हणून शांतता राखण्याच्या उल्लेखनीय कार्यात त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल जवानांना 02 राष्ट्रपती शौर्य पदके जाहीर झाली आहेत.

277 शौर्य पदकांपैकी, जम्मू-कश्मीर पोलिसांचे 72 जवान , महाराष्ट्रातील 18 जवान, छत्तीसगडमधील 26 जवान, झारखंडमधील 23 जवान, ओदिशाचे 15 जवान, दिल्लीतील 08 जवान, सीआरपीएफचे 65 जावं री, एसएसबीचे 21 जवानांना 275 शौर्य पदके जाहीर झाली असून उर्वरित दोन पदके इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि सीएपीएफमधील जवानांना घोषित करण्यात आली आहेत.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (पीएसएम) आणि उल्लेखनीय सेवेसाठी  पदक (एमएसएम)

सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (पीएसएम) प्रदान केले जाते तसेच संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेद्वारे वैशिष्ट्यीकृत उल्लेखनीय सेवेसाठी उल्लेखनीय सेवा पदक (एमएसएम) प्रदान केले जाते. विशिष्ट सेवेसाठी 102 राष्ट्रपती पदकांपैकी (पीएसएम) 94 पोलीस सेवेसाठी, 04 अग्निशमन सेवेसाठी आणि 04 नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. उल्लेखनीय सेवेसाठीच्या (एमएसएम) 753 पदकांपैकी, 667 पदके पोलीस सेवेसाठी, 32 अग्निशमन सेवेसाठी, 27 नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेसाठी आणि 27 सुधारात्मक सेवेसाठी जाहीर करण्यात आली आहेत.

पदकांची सेवानिहाय वर्गवारी खाली दिली आहे.

Name of MedalPolice Service Fire ServiceCivil Defence& Home Guard ServiceCorrectional Service
President’s Medal for Distinguished Service (PSM) (Total Medal Awarded : 102)940404
Medal for Meritorious Service (MSM)(Total Medal Awarded : 753667322727
 Total 761 36 31 27

पदक विजेत्यांच्या यादीचे तपशील खालीलप्रमाणे संलग्न आहेत:

Sl No.Subject Number of personsAnnexure 
1President’s Medal for Gallantry (PMG)02List-I
2Medals for Gallantry (GM)275List-II 
3President’s Medals for Distinguished Service (PSM)102List-III
4Medal for Meritorious Service (MSM)753List-IV 
5State Wise/ Force Wise list of Medals AwardeesAs per listList -V

महारष्ट्रातले अतिरिक्त पोलीस महासंचालक निकेत कौशिक, मीरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप सावंत आणि पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातल्या 18 पोलिस जवानांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत. यात नक्षलप्रभावीत जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रीतील 40  पोलीस जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी पदक जाहीर झाले असून यात कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांचा समावेश आहे. पोलीस उपअधीक्षक, वाहतूक (उत्तर गोवा)  सिद्धांत शिरोडकर यांना  विशिष्ट सेवा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

यादी-I पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यादी-II पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यादी-III पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यादी-IV पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यादी-V पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तपशील www.mha.gov.in आणि https://awards.gov.in वर उपलब्ध आहेत.

Continue reading

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली झोमॅटोची नोंद

भारतातील फूड-ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म, झोमॅटोने डिलिव्हरी पार्टनर्सना जीवन वाचवणारी महत्त्वपूर्ण कौशल्ये शिकवण्यासाठी आयोजित केलेल्या पहिल्या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद घेतली आहे. सर्वात मोठ्या प्रमाणात प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रम एकाच छताखाली एकाच वेळी केल्याचा हा कार्यक्रम मुंबईतल्या नेस्को, गोरेगाव येथे आयोजित करण्यात...

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीकरीता आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुनेत्रा पवार यांनी उमेदवारीअर्ज दाखल केल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली. राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाची बैठक बुधवारी रात्री...

लोकसभा निवडणुकीत मविआत मेरीटनुसार जागावाटप नाही!

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून...
error: Content is protected !!