Thursday, September 19, 2024
Homeडेली पल्सकोणत्याही काळात मनोबल...

कोणत्याही काळात मनोबल वाढविण्यासाठी..

आज, २९ मे रोजी सद्गुरू श्री वामनराव पै यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने कोरोनाच नव्हे तर कोणत्याही काळात मनोबल वाढविणारा हा विशेष लेख!

अपोलो-१३ अवकाशयानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. काही क्षणाचाच अवधी शिल्लक उरला असताना अंतराळवीरांनी पृथ्वीवरील नियंत्रणकक्षाशी संपर्क साधला. मानवी सामर्थ्यापलीकडील पेचप्रसंग आहे हे नियंत्रण कक्षातील शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्यांनी उत्तर दिले, “आता फक्त एकच गोष्ट करणं आपल्या हातात आहे— ती म्हणजे प्रार्थना!”

ग्रहगोलाचा व विश्वरचनेचा सूक्ष्म अभ्यास करणारे विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञही प्रार्थनचं सामर्थ्य मान्य करतात. लोकमान्य टिळक म्हणायचे, “जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते, तेथे प्रार्थनेचे क्षेत्र सुरू होते.” गांधीजी आपल्या दिवसाची सुरूवात व शेवट प्रार्थनेने करीत. एवढेच नव्हे तर ते दिवसभरातदेखील पावलोपावली प्रार्थना म्हणत असत, हे सर्वांना ठाऊक आहेच. रामकृष्ण परमहंस म्हणत, “प्रार्थना म्हणजे एक प्रकारचे भावात्मक ध्यान होय. डॉ. अॅलॅक्सी कॅरेल हे नोबेल पारितोषिक विजेते म्हणतात, “Prayer is the most powerful form of energy that man can generate, मानव निर्माण करू शकतो असा ऊर्जेचा प्रचंड स्त्रोत म्हणजे प्रार्थना. सारांश, प्रार्थनेचे महत्त्व व माहात्म्य सर्वश्रुत व सर्वमान्य आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

मनोबल

भगवद्गीतेत भगवंताने अर्जुनाला ‘इंद्रियागां मन: श्चामि’ (अध्याय १०.२२) असे निसं:दिग्धपणे सांगितले. म्हणजे ‘जिथं मन आहे तिथं मी आहे’ असे बजावले. मन म्हणजे तरी काय? वस्तुतः असंख्य, अगणित विचारांनी सदोदित व्यापलेली एक अथांग पोकळी. भूतकाळाचे चिंतन व भविष्यकाळाची चिंता यासंबंधीचे विचार मनात सतत घर करून असतात.

Nature abhors vacuum अर्थात् निसर्गाला पोकळी मान्य नाही, या भौतिक शास्त्राच्या सिद्धान्तानुसार मनात मोकळी जागा दिसली रे दिसली की प्राय: अनिष्ट, अहितकारक, अपायकारक विचार मनात केव्हा घुसतात ते कळतही नाही. रिकामे मन सैतानाचे घर अशी म्हण आपण वापरतो. मनातील अनिष्ट विचार हाकलून त्याजागी पर्यायी अशा शुद्ध, सात्विक व मंगल विचारांची प्रतिष्ठापना करावी लागते. हे शुद्ध, सात्त्विक व मंगल विचार म्हणजेच जगातील निरनिराळ्या धर्मातील, निरनिराळ्या संतांनी निर्माण केलेल्या प्रार्थना!

जीवनविद्या तत्त्वज्ञानाचे शिल्पकार व विज्ञाननिष्ठ विश्वसंत सद्गुरू श्री. वामनराव पै यांना स्फुरलेली प्रार्थना आजवरच्या प्रचलित पारंपारिक प्रार्थनांपेक्षा अगदी आगळीवेगळी असून प्रार्थनेचा तो एक उत्कट, उत्कृष्ट व अत्युच्य मानबिंदू आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ती विश्वप्रार्थना अशी,

“हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,

सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.

सर्वाचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर

आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.”

जीवनविदयेच्या मानव कल्याणाच्या तत्त्वज्ञानाचे विविध बारकावे व पैलू या छोट्याशा प्रार्थनेत सहजतेने सामावलेले व एकवटलेले आहेत.

कृतज्ञतेने स्मरण

पाप आणि पुण्याबद्दलच्या प्रचलित पारंपारिक संदिग्ध कल्पना बाजूस सारून “कृतज्ञता हेच पुण्य व कृतघ्नता हेच पाप” असे वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध समीकरण जीवनविद्येने मांडले. आपण जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीचा निसर्ग नियमांबरोबरच निसर्गाने मुक्तपणे उपलब्ध करून दिलेली पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश यासारखी पंचमहाभूते व पृथ्वीवरील भूतमात्र अर्थात् चराचर यांच्याशी सतत संपर्क येत असतो.

इतर अनेक व्यक्तींच्या सहचर्यातून व सहकार्यामुळे व्यक्तीचे जीवन फुलत जाते, बहरत जाते, सुसह्य व समृद्ध होते. No man is an island असं जॉन डन या इंग्रजी लेखकाने अगदी सार्थपणे म्हटलेय. या सर्व संबंधितांचे कृतज्ञतेने स्मरण या प्रार्थनेद्वारा केले गेल्याने सहजासहजी पुण्यसंचय होतो. सतत प्रार्थना म्हणत राहिल्याने हा कृतज्ञताभाव सतत जागृत राहतो.

विश्वकल्याणाचा पुरस्कार

निरनिराळ्या धर्मात सध्या उपलब्ध असलेल्या प्रार्थना त्या-त्या धर्मातील लोकांनीच म्हणाव्यात असा अलिखित दंडक होऊन बसला आहे. तसे संस्कार लहानपणापासून बालकावर केले गेल्याने आपल्या धर्माबद्दल आंत्यतिक प्रेम जोपासत असतानाच इतर धर्माबद्दल मात्र अकारण अनादराची भावना निर्माण केली जाते. कालांतराने या भावनेचे रूपांतर आमचा धर्म श्रेष्ठ, आमच्या धर्मातील विधी श्रेष्ठ, आमच्या धर्मातील प्रार्थना श्रेष्ठ अशा संकुचित विचारात होऊन समाजात श्रेष्ठ-कनिष्ठ असा दुजाभाव निर्माण होतो आणि मग समता, सभ्यता, सहिष्णुता, सामंजस्य व समाधान ही मानवी संस्कृतीची जीवनमूल्ये ऱ्हास पावून त्याची जागा नकळतपणे संघर्षाने घेतली जाते.

(पुढे चालू)

Continue reading

व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व  भगवद्गीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत. आज आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्य गुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे  म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दांत म्हणायचे तर गुरुपौर्णिमा  म्हणून साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरु. प्रथम गुरु. नंतर माता, नंतर पिता. जर माझ्या आईवडिलांनी एखादी गोष्ट मला करायला सांगितली पण  माझ्या गुरुंनी करू नकोस असे सांगितले तर ती गोष्ट मी करणार नाही....

गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद अठरा पुराणे व भगवद्गीता महाभारतात आहे. महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत. आज आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्यगुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरू. प्रथम गुरू. नंतर माता, नंतर पिता. जर माझ्या आई-वडिलांनी एखादी गोष्ट मला करायला सांगितली पण माझ्या...

गुरुपौर्णिमा, अर्थात कृतज्ञता दिन!

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. चार वेद,  अठरा पुराणे व भगवदगीता ज्या महाभारतात आहे त्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वांना परिचित आहेत. आषाढ पौर्णिमा हा महर्षी व्यासांचा जन्मदिन. आद्यगुरू महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यासजयंती आपण व्यासपौर्णिमा किंवा अधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करीत असतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, "माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरू. प्रथम गुरू. नंतर माता, नंतर पिता. जर माझ्या आईवडिलांनी एखादी  गोष्ट मला करायला सांगितली, पण माझ्या गुरुंनी करू नकोस असे सांगितले तर ती गोष्ट मी करणार नाही. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट मला...
error: Content is protected !!
Skip to content