डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमधील आघाडीची कंपनी प्रोटीअन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लि. NSDL eGovते Proteanअशी संस्थेची नवीन ओळख निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. नुकतीच त्यांनी त्यांची नवीन ब्रँड मोहीम, अपनी कहानी का हीरो लाँच केली आहे. कंपनीने नागरिकांचे जीवन कसे उंचावते हे दाखवण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचे प्रतीक असलेल्या पंकज त्रिपाठी यांची यासाठी निवड केली आहे.
या चित्रपटाचे कथानक म्हणजे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दररोजच्या असंख्य अडथळ्यांवर मात करणाऱ्या आणि आकांक्षा तसेच आशावादाने भरलेल्या 1.45 अब्ज नायकांना वाहिलेली आदरांजली आहे. असे केल्याने ते त्यांच्या स्वतःच्याच जीवनकथेचे नायक बनतात. या कथांमध्ये प्रोटीअनची भूमिका महत्त्वाची आहे. कारण त्याच्या टॅगलाइनमध्ये म्हटल्याप्रमाणे – ‘प्रोटीअन: इम्पॅक्टिंग एव्हरीवन, एव्हरी डे’. (प्रोटीअन प्रत्येकाच्या दररोजच्या आयुष्यावर परिणाम करते.)
या चित्रपटाबद्दल प्रोटीअन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे मुख्य वाढ आणि विपणन अधिकारी गौरव रामदेव म्हणाले की, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ही एक तांत्रिक संकल्पना आहे जी काहींना समजते. मात्र, गोष्ट सांगताना त्याला त्या साच्यात बसवणे आवश्यक असते. या क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून, केवळ बीएफएसआय आणि स्टार्टअप उद्योगांवरच नव्हे तर या देशातील अशा श्रेणीतील प्रत्येक नागरिकावर प्रभाव टाकणाऱ्या मानवी कथा सांगणे ही आमची जबाबदारी आहे. हाच प्रभाव आम्हाला आमच्या मोहिमेद्वारे हायलाइट करायचा होता जो प्रोटीअन पुनर्बांधणीचा पुढचा भाग आहे. यासाठी पंकज त्रिपाठी यांच्यापेक्षा अधिक चांगला कोणीही आमचा निवेदक असेल असा विचारही आम्ही करू शकत नाही. ते आधी आमचे ग्राहक आणि आता ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. आम्हाला खात्री आहे की, हा चित्रपट लाखो प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या कथांचा नायक बनण्यासाठी प्रेरणा देईल.
ओगिल्वीद्वारे संकल्पित आणि विकसित केलेला, “अपनी कहानी का हीरो” हा हलकेफुलके संवाद आणि नॉस्टॅल्जिक क्षणांचा परिपाक आहे. चित्रपटातील त्यांच्या अनुभवाविषयी बोलताना, सुजॉय रॉय, सीनियर कार्यकारी क्रिएटिव्ह डायरेक्टर, ओगिल्वी म्हणाले की, तंत्रज्ञान ही उत्तम शक्ती आहे. अत्यावश्यक सेवा आणि त्यांची आत्यंतिक गरज असलेल्या लोकांमधील दरी कमी करत आहे. पंकज त्रिपाठी यांचा समावेश असलेला हा नवीन चित्रपट, प्रोटीअनचे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स— उदा. पॅन कार्ड, नॅशनल पेन्शन सिस्टीम, डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क देशभरातील सर्वसामान्यांचे जीवन कसे बदलत आहे याचे सुंदर चित्रण करते. पंकजच्या प्रवासातून, आम्हाला डिजिटल सशक्तीकरणाची खरी शक्ती दिसते, ज्यामुळे महत्त्वाच्या सेवा प्रत्येकासाठी सुलभ, सुरक्षित आणि प्रभावी बनतात.
अभिनेते पंकज त्रिपाठी म्हणाले की, जेव्हा मला या मोहिमेबद्दल सांगण्यात आले तेव्हा मला डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय याबद्दल उत्सुकता होती. परंतु जेव्हा मला त्याची माहिती मिळाली आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे समजले तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. रोजच्या जीवनात वापर करूनही खरंतर आपल्याला या गोष्टी फारशा कळत नाहीत. प्रोटीअनचा एक ग्राहक म्हणून त्यांच्या कथेचा एक भाग बनल्याचा मला आनंद आहे. 3 मिनिटे 50 सेकंदांचा हा चित्रपट पंकजच्या निवेदनाने पुढे जातो. एका सामान्य भारतीयाच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांतून तो प्रेक्षकांना घेऊन जातो. सुरुवात साधीच पण स्वप्ने मोठी! खऱ्या आयुष्यातील असंख्य नायकांसाठी मार्ग मोकळा करणाऱ्या प्रोटीअन उत्पादनांचे परिवर्तनात्मक समर्थन आणि प्रभाव या चित्रपटात चित्रित केले आहेत.