Skip to content
Homeमुंबई स्पेशलयंदा पावसाचा आनंद...

यंदा पावसाचा आनंद लुटा मुंबईच्या क्विन्स नेकलेसवर!

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण असणारा मरीन ड्राईव्हच्या राणीचा रत्नहार (क्विन्स नेकलेस) परिसराचा पदपथ पुन्हा एकदा पर्यटकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या (कोस्टल रोड) कामासाठी बंद ठेवण्यात आलेला सुमारे १.०७ किलोमीटर लांबीचा पदपथ वापरासाठी पूर्ववत करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांसाठी या पदपथाचा पर्यटनासाठी पुरेपूर वापर करता येईल.

क्विन्स नेकलेस

जी. डी. सोमाणी चौक ते सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या दक्षिण ते उत्तर दिशेच्या टप्प्यातील पदपथ आता वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोस्टल रोडअंतर्गत दुसरा बोगदा १० जून २०२४ रोजी खुला करण्यात आला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात येणार्‍या पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा देण्यासाठीचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. या भागात पर्यटकांसाठी प्रसाधनगृह आणि पदपथ स्वच्छतेसाठी नियमितपणे देखरेख ठेवण्यासाठी सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

क्विन्स नेकलेस

मरीन ड्राईव्हच्या परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण या प्रकल्पाच्या निमित्ताने करण्यात आले आहे. त्यामुळे १०.५६ मीटर रूंदीचा आणि सरासरी १ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते मफतलाल क्लब सिग्नलदरम्यान वापरासाठी उपलब्ध झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते उत्तर वाहिनीच्या दिशेला रॅम्पला जोडणारा ४०० मीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे. यापूर्वी असलेल्या फूटपाथचा वापर करून त्यावर हा रस्ता तयार करण्यात आला आहे. तसेच त्यापुढील मफतलाल सिग्नलपर्यंतचा रस्ता असा सरासरी १ किमी लांबीचा नवा रस्ता वापरासाठी उपलब्ध झाला आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलाच्या शेजारच्या या अतिरिक्त सेवा रस्त्याचा उत्तर बोगद्याच्या प्रवेशासाठी वापरता येईल.

क्विन्स नेकलेस

अतिरिक्त सेवा रस्त्यासोबतच पर्यटकांना पदपथही वापरासाठी पुन्हा एकदा उपलब्ध झाला आहे. या पदपथाच्या शेजारच्या समुद्राच्या भिंतीची उभारणी बीम आणि कॉलमचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त भराव न घालताच आतल्या बाजूला हा नवीन पदपथ तयार करण्यात आला आहे. या पदपथाला धडकणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आघात रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर करण्यात आला आहे.

सुसज्ज आसनव्यवस्था

पूर्वीसारखीच पर्यटकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चालण्यासाठी अधिक दर्जेदार पदपथ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय पदपथांना लागूनच चांगली प्रकाशव्यवस्था तयार करण्यासाठी पथदिवे उभारणी नियोजनाचे काम प्रगतिपथावर आहे.

लाटांचा वेग रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर

मरीन ड्राईव्हच्या सी फेस परिसरात धडकणार्‍या लाटांचा वेग आणि आघात रोखण्यासाठी टेट्रापॉडचा वापर किनारपट्टीवर करण्यात आला आहे. संपूर्ण किनारपट्टीवर टेट्रापॉडचा वापर केल्यामुळे लाटांमुळे किनारपट्टीवर होणारा आघात तसेच लाटांचा वेग कमी करण्यासाठी मदत होईल. मरीन ड्राईव्ह किनारपट्टीवर ५९० मीटर भागात टेट्रापॉडचे काम दक्षिण ते उत्तर अशा दिशेत प्रगतिपथावर आहे. 

Continue reading

छत्रपती शिवरायांचा इतिहास अनुभवण्यासाठी निघाले ७०० पर्यटक

भारतीय रेल्वेची गौरवयात्रा अंतर्गत आजपासून सुरू होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि स्वातंत्र्य इतिहास जिवंत ठेवण्याचे काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे. आज या रेल्वेतून सातशेपेक्षा...

14 जूनपर्यंत महाराष्ट्र तापणार! पेरणीची घाई नको!!

जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातल्या मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला असून किमान 15 जूनपर्यंततरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे 14 जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे...

रविवारी आनंद घ्या तेजश्री आमोणकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने, भावे कुटुंबियांच्या सौजन्याने तेजश्री आमोणकर यांचे गायन येत्या रविवारी, १५ जूनला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. तेजश्री आमोणकर, गानसरस्वती पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या नात आहेत. यावेळी यति...