Saturday, July 27, 2024
Homeएनसर्कलहवाई दलाची आपत्कालीन...

हवाई दलाची आपत्कालीन वैद्यकीय हेल्पलाईन सेवा सुरू

भारतीय हवाई दलाच्या (IAF) सेवेत कार्यरत देशभरातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि निश्चित वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी बेंगळुरूमधल्या एअर फोर्सच्या कमांड हॉस्पिटल येथे भारतीय हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्या हस्ते इमर्जन्सी मेडिकल रिस्पॉन्स सिस्टमचे (ईएमआरएस) नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

ईएमआरएस ही भारतीय हवाई दलाचे देशभरातली कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना 24/7 टेलिफोनिक वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुरु करण्यात आलेली अशा प्रकारची पहिलीच हेल्पलाईन आहे. देशभरात कोणत्याही ठिकाणी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या कॉलरना, म्हणजेच भारतीय हवाई दलाचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना त्वरित प्रतिसाद देत, त्यांना वैद्यकीय आणि निमवैद्यकीय व्यावसायिकांच्या पथकाद्वारे मदत पुरवणे, हे या प्रणालीचे उद्दिष्ट आहे. प्रतिसाद देणारा वैद्यकीय व्यावसायिक कॉलरला त्वरित सल्ला देईल आणि त्याचवेळी कॉलरच्या जवळच्या भारतीय हवाई दलाच्या वैद्यकीय सेवा केंद्राशी संपर्क साधेल. ही सुविधा आणीबाणीच्या परिस्थितीत उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या भारतीय हवाई दलाच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. मौल्यवान प्राण वाचवणे, हे ईएमआरएसचे एकमेव उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमात प्रणालीची क्षमता आणि पोहोच यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. अडचणीत सापडलेल्या कॉलरला तज्ज्ञांचे मार्गदर्शन किती सहजतेने प्रदान केले जाईल, तसेच जवळच्या वैद्यकीय सुविधा केंद्राच्या वैद्यकीय सहाय्य पथकाची सेवा तत्काळ कशी मिळवता येईल, यावर माहिती देण्यात आली.

ही संकल्पना मांडणाऱ्या हवाई दलप्रमुखांनी (CAS) ईएमआरएस चे महत्त्व अधोरेखित केले आणि ते म्हणाले की, हा उपक्रम भारतीय हवाई दलासाठी केवळ एक महत्त्वाचा टप्पा नसून, वैद्यकीय सज्जतेमधील मोठी प्रगती आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, तज्ज्ञांद्वारे वैद्यकीय सेवा तत्काळ प्रदान करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचे पुढील पाऊल आहे.

Continue reading

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...

पेटीएमने संपादित केला १५०२ कोटींचा कार्यसंचालन महसूल

पेटीएमने आर्थिक वर्ष २०२४-२०२५च्‍या पहिल्‍या तिमाहीच्या आर्थिक निकालांची घोषणा केली आहे, ज्‍यामधून कंपनीच्या विविध घटकांमधील सुधारणा निदर्शनास येते. कंपनीने १,५०२ कोटी रूपयांच्‍या कार्यसंचालन महसूलासह ७९२ कोटी रूपयांच्‍या ईबीआयटीडीए तोट्याची नोंद केली आहे. कंपनीसाठी अलीकडच्या व्‍यत्‍ययांचा संपूर्ण आर्थिक परिणाम आर्थिक...

साहिल नायरनी लाँच करताहेत ‘मिला ब्‍युटी’..

भारतातील सर्वात लोकप्रिय ब्‍युटी ब्रँड्सचे धोरणात्‍मक समर्थक साहिल नायर त्‍यांचा नवीन उद्यम 'मिला ब्‍युटी' (पूर्वीचा मिलाप कॉस्‍मेटिक्‍स) लाँच करण्‍यासाठी सज्‍ज आहेत. व्‍यवस्‍थापकीय संचालक व सहसंस्‍थापक म्‍हणून साहिल भारतातील ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाईन करण्‍यात आलेल्‍या सर्वोत्तम दर्जाच्‍या, नाविन्‍यपूर्ण...
error: Content is protected !!