Homeटॉप स्टोरीएकनाथ शिंदे, लहान...

एकनाथ शिंदे, लहान मुलांचे लाडके मुख्यमंत्री!

मुंबई महापालिकेच्या संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहिमेच्या शुभारंभानिमित्त काल सकाळपासून मुंबईच्या विविध भागात भेटी देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कामाची तडफ मुंबईकरांना दिसली तर दुसऱ्या बाजूला या मोहिमेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये, लहान मुलांमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्याची, त्यांच्यांशी बोलण्याची उत्सुकता दिसली.

कमला नेहरू उद्यान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले असता त्यांनी सर्वप्रथम रस्त्याच्या पलीकडे उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असताना मुलांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. मग मुख्यमंत्र्यांनीही त्यांची इच्छा पूर्ण करत फोटो काढले. नंतर कमला नेहरू उद्यानाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या विविध विद्यालयाच्या आणि स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना हाक मारली. त्यांनीही मुलांच्या हाकेला प्रतिसाद देत त्यांच्या जवळ जाऊन विचारपूस करत मुलांच्या आग्रहास्तव फोटोपण काढले. हाच प्रकार गिरगाव चौपाटी आणि बी.आय.टी. चाळ येथेही घडला. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांचा हट्ट पुरवत त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले.

गिरगांव चौपाटीवर लुटला क्रिकेटचा आनंद

गिरगाव चौपाटी येथे पाहणीसाठी गेले असता तेथे क्रिकेट खेळणारी मुले मुख्यमंत्र्यांचा ताफा पाहून पुढे आली. तेव्हा वाहनातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उतरलेले पाहून मुलांना आश्चर्याचा धक्का बसला. या मुलांना जवळ बोलावून त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी फोटो काढलेच. याचवेळी या मुलांनी मुख्यमंत्र्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रहही केला. मग मुख्यमंत्र्यांनीदेखील या मुलांचे मन राखून हाती बॅट घेत फटकेबाजी केली. थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत क्रिकेट खेळताना मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

आपल्या विकासाभिमुख कामांमुळे जनतेत लोकप्रिय झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लहान मुलांचेही तितकेच लाडके असल्याचे आजच्या मुंबई संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या दौर्‍यात दिसून आले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content