Homeटॉप स्टोरीमराठा समाजाच्या मागासलेपणासाठी...

मराठा समाजाच्या मागासलेपणासाठी २३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करणार आहे. राज्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे.  सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. २३ जानेवारी २०२४पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

२० जानेवारी २०२४ रोजी जिल्ह्याच्या व महानगरपालिका मुख्यालयाच्या ठिकाणी तालुक्याच्या व वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांना सॉफ्टवेअर वापरण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षक २१ व २२ जानेवारी २०२४ रोजी संबंधित तालुक्याच्या, वॉर्डच्या ठिकाणी तालुक्यातील, वॉर्डमधील सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील व २३ जानेवारी २०२४पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरू होईल. हे सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४पूर्वी पूर्ण होणार आहे.

या सर्वेक्षण कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना आयोगामार्फत ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोगाने कळविले आहे.

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content