Thursday, November 7, 2024
Homeमुंबई स्पेशलकुर्ला, पवई आणि...

कुर्ला, पवई आणि बोरीवलीत होणार घनदाट वृक्षराजी

मुंबई महानगरातील पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील कुर्ला, पवई आणि बोरीवली ही तीन ठिकाणे मिळून तब्बल चार एकर क्षेत्रफळावर साडेतीन हजार वृक्षांची पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज दिली. 

मुंबई महानगरातील झाडांची निगा कशी राखावी, त्यांचे संगोपन कसे करावे, वृक्षलागवड क्षेत्रात कोणकोणते अभिनव उपक्रम राबविण्यात येतील, झाडांची पडझड कशी रोखावी आदी विषयांवर उहापोह करण्यासाठी पालिकेचे आधिकारी आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ आदींची पालिका मुख्यालयात आज बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त गगराणी बोलत

होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त किशोर गांधी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदींसह ‘प्रोजेक्ट मुंबई’चे शिशिर जोशी, पार्ले वृक्ष मित्र संघटनेचे अनिकेत करंदीकर, फ्रेंड्स ऑफ ट्रीजचे डॉ. अशोक कोठारी, तुषार देसाई, अदिती काणे, उद्यानविज्ञातज्ज्ञ रॉबर्ट फर्नांडिस, अनिल राजभर, ‘हरियाली’चे आठल्ये, ‘वातावरण फाउंडेशन’चे भगवान केशभट, ‘मिशन ग्रीन मुंबई’चे सुभाजित मुखर्जी, ‘मियाम ट्रस्ट’चे नितू जोशी, ‘नेचर फॉरेवर’चे मोहम्मद दिलावर, ‘मेगा फाउंडेशन’च्या अनुषा अय्यर आदींसह विविध पर्यावरणविषयी संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ या बैठकीला उपस्थित होते.

मुंबईत अनेक ठिकाणी पुरातन वृक्ष आहेत. त्यांचे संगोपन करण्यासाठी पालिका विविध उपक्रम राबवित आहे. धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणीही वेळच्यावेळी करण्यात येते. यासह अधिकाधिक ठिकाणी वृक्षांची लागवड कशी वाढविता येईल, यासाठीदेखील पालिका प्रयत्नशील

आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत तीन मोठ्या भूखंडांवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यासाठी कुर्ल्यातील चांदिवली, तसेच पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी मोठे भूखंड वृक्ष लागवडीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. हे तीन ठिकाणे मिळून चार एकर भूखंडावर साडेतीन हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या झाडांची निवड कशी करावी, त्यासाठी कोणती शास्त्रोक्त पद्धत वापरावी, त्यांचे आयुर्मान वाढवावे यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत पालिका आराखडा तयार करीत आहे. यासाठी पर्यावरणतज्ज्ञांनी मत नोंदवावे. पालिका कार्यक्षेत्रात आणखी २९ ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचेही गगराणी यांनी नमूद केले. 

पर्यावरण अभ्यासकांनी विविध विषयांवर बैठकीत मते मांडली. मुंबईतील झाडांचे आयुर्मान कसे वाढवावे, झाडांची छाटणी करताना घ्यावययाची काळजी, पुरातन झाडांचे जतन कसे करावे, दुभाजकांमध्ये कोणती झाडे लावावीत आणि ती लावताना कोणती काळजी घ्यावी, झाड दत्तक घ्यावे, ‘एक डॉक्टर – एक झाड दत्तक’ उपक्रम राबवावा, पालिकेच्या उद्यानांमध्ये पक्ष्यांसाठी बारमाही पाण्याची सोय करावी, उड्डाणपुलांखाली जागेचा वापर वृक्षलागवडीसाठी करावा, नागरी वने (मियावाकी) वाढवावीत, शाळांमध्ये जनजागृती करावी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा वृक्षरोपणात सहभाग वाढवावा आदी विविध पर्याय यावेळी सुचविण्यात आले. या पर्यायांचा विचार करून पालिका वृक्षलागवडीसाठी त्याचा उपयोग करणार, असे उद्यान उपायुक्त किशोर गांधी यांनी प्रशासनाच्या वतीने आश्वस्त केले.

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content