Sunday, June 23, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजमतांसाठी काँग्रेसचे नेते...

मतांसाठी काँग्रेसचे नेते घेताहेत कसाबची बाजू!

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते. खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही. पण आपली मतपेढी मजबूत करण्यासाठी काँग्रेस आणि इंडी आघाडी मात्र, या हल्ल्यातल्या दोषींना निर्दोषत्वाची प्रमाणपत्रे वाटत असून महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते दहशतवादी कसाबची बाजू घेत आहेत, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केला.

अहिल्यानगरच्या (अहमदनगर) सावेडी येथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ विजयसंकल्प सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे, आ. प्रा. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, भानुदास बेरड आदी यावेळी उपस्थित होते.

आता इंडी आघाडीचे नेते हताश झाले आहेत आणि देशाबाहेरही त्यांची निराशा दिसू लागली आहे. सीमेपलीकडची काँग्रेसची बी टीम आता सक्रिय झाली असून देशाबाहेरच्या शक्ती काँग्रेसची उमेद वाढविण्यासाठी सरसावल्या आहेत. त्या मोबदल्यात काँग्रेस पाकिस्तानला देशातील दहशतवादी हल्ल्यांपासून क्लीन चिट देत आहे, असा गंभीर आरोप मोदी यांनी केला.

कसाब

4 जून ही इंडी आघाडीची ‘एक्स्पायरी डेट’ ठरणार, हे तिसऱ्या टप्प्यातील मतदानाने स्पष्ट केले आहे. 4 जूननंतर इंडीवाल्यांचा झेंडा उंचावण्यासाठीदेखील कोणी सापडणार नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसप्रणीत आघाडीची खिल्ली उडविली. यावेळची निवडणूक संतुष्टीकरण आणि तुष्टीकरण यांच्यातील लढाई आहे. देशवासीयांना संतुष्ट राखण्यासाठी परिश्रम करण्यासाठी भाजपा-एनडीए आघाडी प्रयत्नशील आहे, तर इंडी आघाडीने मात्र व्होट बँकेच्या तुष्टीकरणासाठी ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसने तर आपल्या संपूर्ण जाहीरनाम्यालाच मुस्लिम लीग बनवून टाकले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, प्रतिष्ठा हे भाजपा – एनडीए चे मुद्दे आहेत. यापैकी एकाही मुद्द्यावर बोलण्याची काँग्रेसची तयारीही नाही. गरीब कल्याणाच्या मुद्द्यावर बोलण्याची वेळ आली तर काँग्रेस शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून बसून राहील. कारण, त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नाहीत. गेल्या 50 वर्षांत गरीबी हटविण्याची खोटी आश्वासने देऊन काँग्रेसने गरीबांचा मोठा विश्वासघात केला आहे. तर चार कोटी पक्की घरे, 50 कोटी गरीबांना जनधन खाती, 80 कोटी गरजवंतांना मोफत धान्याची सुविधा, शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीतून तीन लाख कोटींचे साह्य, पीक विमा योजनेतून दीड लाख कोटींची भरपाई मिळण्याची हमी मोदी देतात. पिकांच्या हमीभाव वाढविण्याची हमी देतात आणि काँग्रेस मात्र तोंडावर पट्टी बांधून गप्प बसते, असा हल्ला त्यांनी चढविला.

अलीकडे काँग्रेस व इंडी आघाडीने एक अत्यंत धोकादायक कट रचला असल्याचा इशारा देत मी वारंवार देशाला सावध केले आहे. अलीकडेच बिहारमधील तुरुंगातून बाहेर आलेल्या या आघाडीच्या एका बड्या मोहऱ्याने या खतरनाक खेळाची चुणूक दाखविली आहे. इंडी आघाडीची सत्ता आली, तर देशात मुसलमानांना आरक्षण दिले जाईल, असे चारा घोटाळाप्रकरणी ज्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे, त्यानेच आज माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. केवळ आरक्षणच नव्हे, तर संपूर्ण आरक्षण दिले जाईल, असेही त्या नेत्याने जाहीर केले आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि गरीबांकरिता असलेले संपूर्ण आरक्षण काढून मुस्लिमांना दिले जाईल असाच याचा स्पष्ट अर्थ आहे. हे संपूर्ण आरक्षण हिसकावून घेऊन मुसलमानांना दिले जाईल, असा इंडी आघाडीचा डाव असून आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी मुस्लिमांना आरक्षण देण्याचा इंडी आघाडीचा इरादा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

कसाब

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह संपूर्ण संविधान सभेने ज्याला विरोध केला होता, तेच पाप आता काँग्रेस आणि इंडी आघाडी करू पाहात आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण संविधानास मान्य नाही, तरी इंडी आघाडी मात्र, आपल्या मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संविधानच बदलण्याचा या आघाडीचा इरादा आहे. मात्र, जनता काँग्रेसची ही चाल यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात काँग्रेसने शेतकऱ्यांना संकटात ढकलले. दुष्काळात शेतकरी होरपळत असताना काँग्रेस मात्र लुबाडतच राहिली. वर्षानुवर्षे ताटकळत असलेले प्रकल्प पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या. निळवंडे धरणाचे काम 1970 साली सुरू झाले, तेव्हा त्यासाठी आठ कोटी रुपये खर्च करावे लागणार होते. हे काम रखडल्यामुळे हा खर्च पाच हजार कोटींवर गेला. हे काँग्रेसचेच पाप आहे. 2017मध्ये फडणवीस सरकारने या प्रकल्पास वेग दिला. आता लवकरच ही योजना पूर्ण होऊन अहिल्यानगर आणि नाशिकमधील शेकडो हेक्टर जमीनीला पाणी मिळेल, हजारो हेक्टर जमिनीवर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होतील अशी ग्वाहीही पंतप्रधान मोदींनी दिली.

Continue reading

एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायासाठी व्यावसायिक प्रशिक्षण

फेडरल एक्‍स्‍प्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्‍स्‍प्रेस परिवहन कंपनी व्‍यावसायिक प्रशिक्षण स्‍कॉलरशिप्‍स देत जवळपास १०० एलजीबीटीक्‍यूआयए+ समुदायातल्या सदस्‍यांना अपस्किल करत आहे. या उपक्रमांतर्गत पात्र एलजीबीटीक्‍यूआयए+ व्‍यक्‍तींना सौंदर्य, शिवणकाम, नृत्‍य, मेकअप व मेहंदी कला अशा विविध क्षेत्रांमध्‍ये व्‍यावसायिक प्रशिक्षण...

मंदीच्या वातावरणातही एआय, एफएमसीजी क्षेत्रात रोजगारात वाढ

मंदीच्या वातावरणातही एआय, एफएमसीजी, ऑईल अँड गॅस क्षेत्रामधील रोजगारामध्‍ये वाढ झाल्याचे नोकरी जॉबस्‍पीकच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. नोकरी जॉबस्‍पीक इंडेक्‍स हा भारतातील व्‍हाइट कॉलर हायरिंग आघाडीचा सूचक एप्रिल २४च्‍या तुलनेत मे महिन्‍यामध्‍ये ६ टक्‍क्‍यांनी वाढला. पण गेल्‍या वर्षाच्‍या मे महिन्‍याच्‍या...

डी.एल.एड. प्रथम वर्ष प्रवेशासाठी 25 जूनपर्यंत मुदतवाढ

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25करिता डी.एल.एड. (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 25 जून 2024पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी डी.एल.एड. (D.El.Ed) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 18 जून 2024पर्यंत होती. तथापि बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व...
error: Content is protected !!