बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘एन’ विभागातील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक १ व २च्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे एका कप्प्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही भागांच्या पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक २चे दुरूस्तीचे काम २४ ऑगस्टपासून सुरू झाले आहे. जलाशयाच्या दोन्ही कप्प्यांचे काम २० महिने (पावसाळा वगळता) सुरू राहणार आहे. या कालावधीमध्ये पाणीपुरवठा एका कप्प्यातून केला जात आहे. या कारणाने पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरीता खालील ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
१) पाणीपुरवठा झोन– नारायण नगर
आधीची पाणीपुरवठ्याची वेळ- दुपारी ०३.१५ ते सायंकाळी ०७.१५
पाणीपुरवठ्याची नवीन वेळ- दुपारी ०२.३० ते सायंकाळी ०५.०० व रात्री १०.४५ ते रात्री ११.३०
विभागांचे नाव–
चिराग नगर, आझाद नगर, गणेश मैदान, पारशीवाडी, नवीन माणिकलाल इस्टेट, एन. एस. एस. मार्ग, महिंद्रा पार्क, डी. एम. पथ, खलई गाव, किरोल गाव, विद्याविहार पश्चिम, हंसोटी गल्ली, खोत गल्ली, एम. जी. मार्ग, नौरोजी पथ, एच. आर. देसाई मार्ग, कामा पथ, श्रद्धानंद मार्ग, जे. वी. मार्ग, गोपाल गल्ली, जीवदया गल्ली, गीगावाडी.
२) पाणीपुरवठा झोन- पंतनगर आउटलेट
आधीची पाणीपुरवठ्याची वेळ- सायंकाळी ०६.४५ ते रात्री ११.००
पाणीपुरवठ्याची नवीन वेळ- सायंकाळी ०६.१५ ते रात्री १०.३०
विभागांचे नाव–
भीमनगर, पवार चाळ, लोअर भीमनगर, क्राईम ब्रँच परिसर, वैतागवाडी, नित्यानंद नगर, धृवराजसिंग मार्ग, सी. जी. एस. कॉलनी, गंगावाडी, एमटीएनएल गल्ली, एजीएलआर मार्ग, एलबीएस मार्ग, घाटकोपर, पश्चिम लगतचा परिसर, श्रेयस सिग्नल इत्यादी.
३) पाणीपुरवठा झोन- सर्वोदय बुस्टींग
आधीची पाणीपुरवठ्याची वेळ- सायंकाळी ०७.१५ ते रात्री ०९.१५
पाणीपुरवठ्याची नवीन वेळ- सायंकाळी ०७.१५ ते रात्री ०९.१५
विभागांचे नाव–
सेनिटोरीयम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद मार्ग, जे. वी. मार्ग, गोपाल गल्ली, एल. बी. एस. मार्ग लगतचा परिसर, घाटकोपर (पश्चिम), गांधी नगर.
जलाशयाच्या एकाच कप्प्यातून पाणीपुरवठा केला जात असल्याने काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तरी सर्व नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.