Homeब्लॅक अँड व्हाईट12,343 कोटींच्या 6...

12,343 कोटींच्या 6 रेल्वे प्रकल्पांना केंद्राची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या 6 (सहा) प्रकल्पांना काल मंजुरी दिली असून एकूण 12,343 कोटी (अंदाजे) रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पांना केंद्र सरकार 100% अर्थसहाय्य पुरवणार आहे.

मल्टी-ट्रॅकिंग प्रस्तावांमुळे रेल्वेसेवा सुलभ होईल, कोंडी कमी होईल आणि भारतीय रेल्वेच्या सर्वाधिक व्यस्त मार्गांवर आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवभारताच्या संकल्पनेच्या अनुषंगाने हे प्रकल्प असून या प्रांतातील व्यापक विकासाद्वारे ते या भागातील लोकांना  “आत्मनिर्भर” बनवतील आणि त्यांच्या रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.

राजस्थान, आसाम, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि नागालँड या 6 राज्यांमधील 18 जिल्हे समाविष्ट असलेल्या या 6 प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे विद्यमान जाळे 1020 किलोमीटरने वाढेल आणि या राज्यांमधील लोकांना सुमारे 3 कोटी मनुष्य-दिवस रोजगार उपलब्ध करून देईल. हे प्रकल्प मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटीच्या पीएम -गती शक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्यामुळे आणि एकात्मिक नियोजनाद्वारे शक्य झाले असून प्रवासी, माल आणि सेवांच्या वाहतुकीसाठी वेगवान कनेक्टिव्हिटी प्रदान करतील.

S.No.Name of Section for doubling stretchLength in (kms.)Estimates cost (Rs.)State
1Ajmer-Chanderiya178.281813.28Rajasthan
2Jaipur-Sawai Madhopur131.271268.57Rajasthan
3.Luni-Samdari-Bhildi271.973530.92Gujarat & Rajasthan
4Agthori-Kamakhya with new Rail cum Road Briedge7.0621650.37Assam
5Lumding-Furkating1402333.84Assam & Nagaland
6Motumari-Vishnupuram andRail over Rail at Motumari 88.81 10.871746.20Telangana & Andhra Pradesh

अन्नधान्य, अन्नपदार्थ, खते, कोळसा, सिमेंट, लोखंड, पोलाद, फ्लाय-ॲश, क्लिंकर, चुनखडी, पीओएल, कंटेनर इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत. क्षमता वृद्धी कामांमुळे अतिरिक्त 87 एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) मालवाहतूक होईल. रेल्वे हे वाहतुकीचे पर्यावरणस्नेही आणि ऊर्जाकार्यक्षम साधन असल्यामुळे हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि देशाचा लॉजिस्टिक खर्च, तेल आयात आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मदत होईल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content