एडनच्या आखातात भारतीय नौदलाने ड्रोन हल्ला करत नुकतेच एक मालवाहू जहाज वाचवले. 17 जानेवारी 24 रोजी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी सागरी चाच्यांनी एमव्ही जेन्को पिकार्डी जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचे समजताच भारतीय नौदलाने एडनच्या आखातात चाचेगिरीविरोधी कारवाईसाठी आयएनएस विशाखापट्टणम तैनात केले.
एडनच्या आखातात चाचेगिरीविरोधी गस्तीदरम्यान आयएनएस विशाखापट्टणमकडे मदतीची मागणी करण्यात आली तेव्हा सहाय्य प्रदान करण्यासाठी 18 जानेवारी 24 रोजी रात्री साडेबारा वाजता जहाजे रोखण्यात आली. एमव्ही जेन्को पिकार्डी जहाजावर 22 कर्मचारी (09 भारतीय) होते. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आणि आग आटोक्यात आल्याची नोंद आहे.
आयएनएस विशाखापट्टणमचे भारतीय नौदल इओडी विशेषज्ञ 18 जानेवारी 24च्या पहाटे क्षतिग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जहाजावर चढले. इओडी तज्ज्ञांनी सखोल तपासणीनंतर हे क्षेत्र पुढील वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे सांगितल्यावर जहाज पुढच्या बंदराकडे मार्गस्थ झाले.