Saturday, February 8, 2025
Homeहेल्थ इज वेल्थनैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांसाठी लावा...

नैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांसाठी लावा टोल फ्री नंबर 14416

सध्या इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल लागले आहेत. या परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेले अथवा अपयश आलेल्या विद्यार्थ्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यामधून बाहेर काढण्याकरीता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा उपलब्ध आहे. टेलिमानस सेवेकरिता टोल फ्री क्रमांक 14416 (भ्रमणध्वनीसाठी) आणि 18008914416 (लँडलाईनसाठी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी या सेवेचा गरजू विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, सायक्याट्रिक नर्स आणि सायक्याट्रिक सोशल वर्कर समुपदेशनाचे कार्य करीत असून या सेवेसाठी मनोविकृतीतज्ज्ञदेखील नियुक्त आहेत. राज्यात आजपर्यंत 70 हजार व्यक्तींनी अशा समुपदेशनाचा लाभ घेतला आहे. यामध्ये नैराश्य, ताणतणाव, निद्रानाश, दु:खी मन:स्थिती, पौगंडावस्थेतील मानसिक स्थित्यंतरे आदी समस्यांचे निराकारण केले जाते. राज्याच्या टेलिमानस कार्यक्रमाच्या उपयोगीतेमध्ये देशात दुसरा क्रमांक आहे. मोठ्या प्रमाणात गरजू नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत, असे आयुक्त, आरोग्य सेवा यांनी कळविले आहे.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content