Thursday, January 23, 2025
Homeहेल्थ इज वेल्थगुंतागुंतीच्या ब्रेन ट्यूमर...

गुंतागुंतीच्या ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेसाठी वापरणार बीकेऍक्टीव्ह मशीन

मुंबईतल्या टाटा मेमोरियल केंद्राच्या (TMC) न्यूरोसर्जरी विभागाने अलीकडेच गुंतागुंतीच्या ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेसाठी देशातील पहिली अत्याधुनिक इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड (आययूएस) इमेजिंग उपकरण खरेदी केले आहे. बीकेऍक्टीव्ह मशीन ही अलीकडेच खरेदी करण्यात आलेली यंत्रणा देशातील पहिली अत्याधुनिक आययूएस प्रणाली आहे.

टाटा मेमोरियल केंद्राच्या डॉ. अली असगर मोयादी यांच्या नेतृत्त्वाखालील न्यूरोसर्जरी टीमने भारतामधील इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड इमेजिंग यंत्रणा तंत्रज्ञानाचा प्रारंभ केला आहे आणि ही टीम जगभरातील अग्रणी टीमपैकी एक आहे. आययूएस हे अतिशय किफायतशीर तंत्रज्ञान आहे आणि योग्य प्रशिक्षणाने एखाद्या न्यूरोसर्जनच्या भात्यातील महत्त्वाचे आयुध ठरू शकते. 

इन्ट्रिन्सिक ब्रेन ट्यूमर सुरक्षितपणे आणि अचूकतेने काढून टाकण्यासाठी इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंग अतिशय महत्त्वाची यंत्रणा आहे. नेव्हीगेशनल मदतीसह (जी सर्जिकल जीपीएस प्रणालीप्रमाणे आहे). आययूएस यंत्र न्यूरोसर्जनना ट्यूमरचे अवशेष अचूकतेने काढण्यास मदत करते. त्याबरोबरच अवेक सर्जरीसारख्या ब्रेन मॅपिंग तंत्रज्ञानाची जोड दिल्यास, मेंदूमधील अगदी जास्त महत्त्वाची कार्ये असलेल्या भागातूनही ट्यूमर मुळापासून काढून टाकता येतो.

1 जून 2024 रोजी मुंबईत परळ येथे टाटा मेमोरियल रुग्णालयात, टाटा मेमोरियल केंद्राचे उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे, टाटा मेमोरियल केंद्राचे न्यूरोसर्जरी प्रमुख डॉ. अली असगर मोयादी, विप्रो जीई हेल्थकेअर साऊथ आशिया अली असगर मोयादी, विप्रो जीई हेल्थकेअर साऊथ आशियाचे व्यवस्थापकीय संचालक चैतन्य सरवटे आणि संपूर्ण विभागीय आणि शस्त्रक्रिया कक्षातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत या प्रणालीचे उद्घाटन झाले.

या अत्याधुनिक साधनामुळे आपल्या चमूला मदत मिळेल आणि  इतर कोणत्याही भागात या अत्याधुनिक प्रणालीचा अनुदानित दरामध्ये लाभ मिळू शकत नसलेल्या ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांना त्याचा फायदा होईल, असे डॉ. मोयादी यांनी सांगितले. इतर इंट्राऑपरेटिव्ह इमेजिंग प्रणालींपेक्षा (इंट्राऑपरेटिव्ह एमआरआयसारख्या) आययूएस प्रणाली स्वस्त असल्याने आपल्यासारख्या संसाधनांची कमतरता असलेल्या आरोग्यप्रणालीला त्याचा फायदा होणार आहे. या विभागाने न्यूरोसर्जनना प्रशिक्षित करण्यासाठी आणि त्यांना या प्रणालीच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्यासाठी भारतात तसेच परदेशात प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यासाठी हा विभाग प्रयत्न करत आहे.

हे उपयुक्त तंत्रज्ञान अधिकाधिक न्यूरोसर्जन आत्मसात करतील आणि भारतामधील अनेक रुग्णांना त्याचे लाभ देतील, अशी अपेक्षा मोयादी यांनी व्यक्त केली. यूबीएसने दिलेल्या उदार मदतनिधीच्या मदतीने या उपकरणाची खरेदी करण्यात आली आहे. टीएमसीच्या प्रयत्नांना अशा योगदानामुळे सर्व भारतीयांसाठी आधुनिक कर्करोग उपचार पुरवणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये बोलताना सरवटे म्हणाले की, शल्यविशारदांना मेंदूतील यंत्रणा आणि दोष यांची पाहणी करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा  शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि मानवी शरीरात यंत्रांचा वापर करण्यासाठी अशा प्रकारच्या ऍक्टीव्ह इमेजिंग प्रणालीची रचना करण्यासाठी, आम्ही वचनबद्ध आहोत आणि या सहकार्यामुळे भारतात आरोग्यनिगा तंत्रज्ञानात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. यामुळे न्यूरोसर्जरी क्षेत्रात बीकेऍक्टीव्ह अल्ट्रासाऊंड प्रणाली क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे.

Continue reading

अजित घोष ट्रॉफी महिला क्रिकेटः साईनाथ स्पोर्ट्सला विजेतेपद

सेजल विश्वकर्मा (६४), श्रावणी पाटील (नाबाद ४७) यांच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर साईनाथ स्पोर्ट्स क्लबला ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकवण्यात यश आले. त्यांनी यजमान स्पोर्टिंग युनियन क्लबचा ३५ धावांनी पराभव केला. सेजल आणि श्रावणीच्या दुसऱ्या विकेटच्या...

पं. कान्हेरे, पं. द्रविड, संजय मोने आदींना ‘दादर-माटुंगा’ पुरस्कार!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले असून येत्या रविवारी, २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता केंद्रात होणाऱ्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, पं. अरुण द्रविड,...

घोष ट्रॉफी क्रिकेटः डॅशिंग आणि स्पोर्टिंग युनियनही उपांत्य फेरीत

गतविजेत्या डॅशिंग क्रिकेट क्लबसह भामा सी. सी., साईनाथ आणि स्पोर्टिंग युनियन या संघांनी ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. स्पर्धेतील शेवटच्या दोन साखळी लढतींमध्ये भामा सी. सी.ने डॅशिंगवर २५ धावांनी मात करत गटामध्ये अव्वल...
Skip to content