Saturday, July 27, 2024
Homeमाय व्हॉईसभाजपाने शिवसेनेचे आमदार...

भाजपाने शिवसेनेचे आमदार पळवले.. मात्र पुरावा नाही!

आपल्या पक्षाच्या आमदारांना भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली भ्रष्ट मार्गाने सूरतमार्गे गुवाहटीला नेण्यात आले, असा दावा करतानाच उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी याबाबत आपल्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे आज विधानसभा अध्यक्षांपुढील शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरील सुनावणीत स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. सकाळच्या सत्रात ठाकरे गटाच्या वतीने एड. देवदत्त कामत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने एड. महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्याचवेळी शिंदे गटाच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणीही केली.

सुनील प्रभू यांनी इंग्रजीत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात काय म्हटले आहे हे वाचले आहे ना? इंग्रजी भाषा समजते ना? आपण स्वेच्छेने इंग्रजीत प्रतिज्ञापत्र दिले आहे ना?, असे अनेक प्रश्न यावेळी प्रभूंना विचारण्यात आले, ज्याला त्यांनी होकार दिल्याचे कळते. त्यानंतर भाजपाने भ्रष्ट मार्गाने आमदारांना पळविण्याचा मुद्दा पुढे आला ज्यावर त्याबाबत आपल्याकडे कोणताही पुरावा नसल्याचे प्रभू यांनी सांगितले. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या व त्या अनुषंगाने लोकांमध्ये झालेली चर्चा याच्या आधारावर आपण हे विधान केल्याचे त्यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

आमदार

दुपारच्या सत्रातही प्रभू यांचीच साक्ष नोंदवण्यात आली. सुनील प्रभू त्यांच्या वकिलांसोबत बसले होते. यावरही शिंदे गटाने आक्षेप घेतला. साक्षीदाराला त्याच्या वकिलांबरोबर बसण्याची परवानगी देऊ नये. त्यांची स्वतंत्र बसण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर अध्यक्षांनी दुसऱ्या सत्रात सोय करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर विधान भवनात विटनेस बॉक्स तयार करण्यात आला. तसेच संपूर्ण साक्षीचा व्हिडिओ तयार केला जावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी केली. चार वेळा अशी मागणी करण्यात आली. मात्र, सर्व साक्षीपुरावे पब्लिक डोमेनमध्ये राहणार आहेत, असे सांगत अध्यक्ष नार्वेकर यांनी ती फेटाळून लावल्याचे सूत्रांनी सांगितले.

या उलटतपासणीत सुनील प्रभू यांना विचारण्यात आले की, २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप-शिवसेनेची युती होती का? त्यावेळी प्रचार करताना तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या नावाने मते मागितली का? किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली का? त्यावर सुनील प्रभूंनी एकच उत्तर दिले. मी आमदार म्हणून जी विकासकामे केली होती त्याचआधारे मी मते मागितली.

संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत आजची सुनावणी झाली. उद्या सकाळी साडेअकरा वाजल्यापासून पुन्हा सुनावणी केली जाणार आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत सलग सुनावणी होईल. त्यानंतर २८ नोव्हेंबरपासून सलग सात दिवस सुनावणी केली जाणार आहे.

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!