Homeमुंबई स्पेशलमुंबईत गोरख चिंचेला...

मुंबईत गोरख चिंचेला येणार अच्छे दिन!

मुंबईतल्या आरे कॉलनीतील मरोळ मरोशी रोडवरील गोरख चिंचेच्या झाडाच्या बुंध्याभोवती असलेले विटांचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून काल, रविवारी तत्काळ काढून टाकण्यात आले. याऊलट पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने या झाडाच्या बुंध्याशी नैसर्गिक आळे (Tree Basin) बनवून त्यात मातीदेखील टाकण्यात आली.

महापालिकेच्या एच पश्चिम विभागातून हटविण्यात आलेल्या पुरातन गोरख चिंचेच्या झाडाच्या बदल्यात पालिकेच्या विविध उद्यानांमध्ये नव्याने गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण केले जात आहे. मुंबई महानगराचे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा उद्यान विभाग सतत विविध उपक्रम राबवित असते.

गोरख चिंच

उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या निर्देशानुसार या महानगरातील उद्यानांमध्ये विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण आणि जतन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून रविवारी आरे कॉलनीतील मरोळ मरोशी रोडवरील गोरख चिंचेच्या झाडाच्या बुंध्याभोवती असलेले विटांचे बांधकाम काढून टाकण्यात आले. याशिवाय उद्यान विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यवाही करीत या झाडाच्या बुंध्याशी मोठे आळे (Tree Basin) बनवून त्यात मातीदेखील टाकली. त्यामुळे या झाडाचे आयुष्य वाढणार आहे. तसेच पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठीदेखील याची मदत होणार आहे.

अनेक उद्यानांत होणार गोरख चिंचेच्या रोपांचे  रोपण

एच पश्चिम विभागातील पुरातन गोरख चिंचेच्या झाडाचेंदेखील रोपण पालिकेतर्फे करण्यात येणार आहे. उद्यान विभागाने पालिकेच्या विविध उद्यानांचीही निवड केली असून त्यात गोरख चिंचेच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्याकरिता १० ते १५ वर्षांची मोठी रोपे मागविण्यात आली आहेत. परंतु सध्या उष्मा जास्त असल्याने पुढील एक ते दोन आठवड्यात एच पश्चिम विभागातील विविध उद्यानात त्यांचे रोपण करण्यात येणार असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. 

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content