Saturday, February 8, 2025
Homeकल्चर +'बॅटल ऑफ सेवास्तोपोल' उद्या 'अल्ट्रा...

‘बॅटल ऑफ सेवास्तोपोल’ उद्या ‘अल्ट्रा झकास’वर!

जगाच्या इतिहासात असे कित्येक सैनिक आहेत ज्यांनी आपला देश वाचवताना आपल्या प्राणांची आहुती दिली. परंतु जगाने त्यांची कधी दखल घेतली नाही. अशीच एक शूर आणि धाडसी महिला होऊन गेली जिने आपले सर्वस्व देशासाठी समर्पित केले. ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर उद्या, ५ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘बॅटल ऑफ सेवास्तोपोल’ चित्रपटाच्या माध्यमातून ही कथा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

‘बॅटल ऑफ सेवास्तोपोल’ हा चित्रपट मूळचा रशियाचा असून चित्रपटाचे दिग्दर्शन ‘सेर्गे मोक्रिट्स्कीय’ यांनी केले आहे. कथा एका तरुण सोव्हिएत महिला ल्युडमिला हिच्या भोवती फिरते. ल्युडमिला जर्मन आक्रमणाशी लढण्यासाठी सैन्यात सामील होऊन दुसऱ्या महायुद्धात सर्वात प्राणघातक बंदुकधारी सैनिक होते. परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच हृदयद्रावक घटना घडतात ज्याने तिचं मन खचत जातं…

‘बॅटल ऑफ सेवास्तोपोल’ म्हणजे फक्त सीमेवरच्या लढाईबद्दल नाही तर एका स्त्री सैनिकाच्या मनाचा वेध घेऊन प्रेक्षकांचं मन पिळवटून टाकणारा चित्रपट आहे, असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

बॅटल ऑफ सेवास्तोपोल‘ चित्रपटाचे प्रोमो पाहण्यासाठी लिंक

https://www.facebook.com/UltraJhakaas

https://www.instagram.com/ultrajhakaas

https://www.youtube.com/@ultrajhakaas

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content