Thursday, June 13, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईट'एलजीबीटीक्यूआयएप्लस'साठी 'अराईज एजयुआर'!

‘एलजीबीटीक्यूआयएप्लस’साठी ‘अराईज एजयुआर’!

ॲक्सिस बँकेने त्यांच्या ‘दिलसे ओपन’ तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने कशिश मुंबई इंटरनॅशनल क्विअर फिल्म फेस्टिव्हलमध्ये अराईज एजयुआर (ARISE ComeAsYouAre) प्रोग्राम लाँच करत असल्याची नुकतीच घोषणा केली. एलजीबीटीक्यूआयएप्लस (LGBTQIA+) समुदायासाठी हा नवीन संधी निर्माण करणारा प्रोग्राम आहे.

‘ARISE ComeAsYouAre’ हा एक खुला कॅम्पस प्रोग्राम आहे, जो कौशल्य-आधारित नोकरीवर भर देतो. विशिष्ट पदवी किंवा महाविद्यालयीन साखळी यासारख्या पारंपरिक घटकांपेक्षा एखाद्या व्यक्तीच्या स्किलसेट्सवर प्राधान्य देतो. नोकरीच्या बाजारपेठा जसजशा विकसित होत आहेत, तसतसे उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी काहीही असो, योग्य कौशल्ये असलेले उमेदवार शोधणे अधिक महत्त्वाचे होत आहे. भारतातील कोणत्याही महाविद्यालयातील प्रतिभावान LGBTQIA+ व्यक्तींचे ॲक्सिस बँकेत अर्ज  करण्यासाठी आणि बँकिंगमध्ये करिअर घडवण्यासाठी स्वागत करण्यासाठी हा भर्ती कार्यक्रम तयार  करण्यात आला आहे.

विविधता, समानता आणि समावेशन स्वीकारण्यासाठी ॲक्सिस बँकेने आपल्या प्रवासात अनेक पुढाकार घेतले आहेत. 2021मध्ये बँकेने ‘ComeAsYouAre’ या उपक्रमाची घोषणा केली; LGBTQIA+ समुदायातील कर्मचारी आणि ग्राहकांसाठी धोरणे आणि पद्धतीसाठी पहिले पाऊल होते. समलिंगी  भागीदारांना संयुक्त बचत खाती आणि/किंवा मुदत ठेवी उघडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले, एकमेकांना नामनिर्देशित म्हणून सूचीबद्ध केले गेले आणि विविध लिंगांच्या ग्राहकांसाठी सन्माननीय Mx जोडण्याचा पर्याय दिला.

2022मध्ये Axis बँकेने LGBTQIA+ समुदायातील ग्राहकांसाठी ग्रुप मेडिकेअर उत्पादने ऑफर  करण्यासाठी टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Tata AIG) सोबत भागीदारी केली. ‘ARISE ComeAsYouAre’  हा उपक्रम सुरू करून ॲक्सिस बँकेने पुढचे पाऊल टाकले आहे. विविधता, समानता आणि संस्था आणि तिच्या इकोसिस्टममधील समावेशकतेचा समावेश करणाऱ्या उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये बँक प्रगती करत आहे.

5 वर्षांपर्यंतचा अनुभव असलेल्या नवीन पदवीधर आणि व्यावसायिकांना त्यांची कौशल्ये, क्षमता आणि  नवीन दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या गतिमान आणि सर्वसमावेशक वातावरणात त्यांचे करिअर  सुरू करण्याची समान संधी मिळेल. बँकिंग क्षेत्रातील त्यांची कौशल्ये आणि ज्ञान विकसित करण्यात मदतकरण्यासाठी ते त्यांना भरपूर शिकण्याच्या संधीदेखील दिली जाईल.

या उपक्रमावर बोलताना ॲक्सिस बँकेच्या प्रेसिडेंट आणि हेड, ह्यूमन रिसोर्सेस, राजकमल वेम्पती म्हणाल्या की, अॅक्सिस बँकेमध्ये आम्ही विविधता, समानता आणि समावेशावर आमचे लक्ष केंद्रित केले आहे. लिंगभेदाला पार करून विस्तारलेल्या विशिष्ट जीवन प्रवास आणि विविध ओळखींचे महत्त्व यामध्ये दिले जाते. आमचा विश्वास आहे की ते नावीन्यपूर्ण संस्कृतीला चालना देते आणि समृद्ध लोकसंख्येमध्ये अस्तित्त्वात असलेल्या आमच्यासारख्या अनेक टॅलेंट पूलचा लाभ घेते.

समान प्रक्रिया, उत्पादने आणि धोरणे तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर आमचा भर आहे. त्यातून आम्हाला प्रत्येकाची भरभराट होण्यासाठी जागा बनवता येते. या प्रयत्नात, आम्हाला आमच्या ‘ARISE ComeAsYouAre’ या अद्वितीय कार्यक्रमाद्वारे LGBTQIA+ समुदायातील प्रतिभावान व्यक्तींना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आनंद होत आहे. या प्रोग्राममध्ये आम्ही कौशल्यांना प्राधान्य देतो, अधिक समावेशक टॅलेंट पूलला प्रोत्साहन देतो. बँकिंगचे भविष्य वैविध्यपूर्ण आहे आणि ARISE हा  आमचा सेतू आहे, जो आम्हाला सर्व स्तरातील प्रतिभावान व्यक्तींशी जोडतो.

या उपक्रमावर बोलताना ॲक्सिस बँकेचे एसव्हीपी आणि हेड – डाइवर्सिटी, इक्विटी आणि इंक्लूजन, हरीश अय्यर म्हणाले की, ॲक्सिस बँकेत आम्हाला विश्वास आहे की नवीन दृष्टीकोनांसह वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक कार्यबल हे नाविन्यता आणण्यासाठी व्यासपीठ असू शकते. ‘ARISE ComeAsYouAre’ हा प्रोग्राम विविध पार्श्वभूमीतील प्रतिभावानांना एकत्र आणून त्यांच्या भविष्याला  आकार देते. पारंपरिक पार्श्वभूमीपेक्षा कौशल्ये आणि क्षमतांवर लक्ष केंद्रित करते आणि आम्हाला कल्पना आणि नव्या दृष्टिकोनांच्या विस्तृत श्रेणीची संधी देते. पूर्वाग्रह कमी करणारी आणि सर्व उमेदवारांची  पार्श्वभूमी काहीही असो त्यांचे निष्पक्ष मूल्यांकन सुनिश्चित करणारी सु-परिभाषित मूल्यमापन प्रक्रिया असणे महत्त्वाचे आहे.

‘ARISE ComeAsYouAre’ programबद्दल अधिक वाचण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा-

www.AxisBankArise.Hirepro.in/ComeAsYouAre 

Continue reading

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली झोमॅटोची नोंद

भारतातील फूड-ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म, झोमॅटोने डिलिव्हरी पार्टनर्सना जीवन वाचवणारी महत्त्वपूर्ण कौशल्ये शिकवण्यासाठी आयोजित केलेल्या पहिल्या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद घेतली आहे. सर्वात मोठ्या प्रमाणात प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यक्रम एकाच छताखाली एकाच वेळी केल्याचा हा कार्यक्रम मुंबईतल्या नेस्को, गोरेगाव येथे आयोजित करण्यात...

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी दिलेल्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीकरीता आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुनेत्रा पवार यांनी उमेदवारीअर्ज दाखल केल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांना दिली. राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळाची बैठक बुधवारी रात्री...

लोकसभा निवडणुकीत मविआत मेरीटनुसार जागावाटप नाही!

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून...
error: Content is protected !!