Thursday, December 12, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटएयू आणि फिनकेअर...

एयू आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा!

एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे संचालक मंडळ आणि फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक लि.चे  संचालक मंडळ यांच्या कालच्या बैठकीनंतर एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांच्या सर्व-शेअर विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली.

बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९च्या कलम ४४अ अंतर्गत होणाऱ्या या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेला एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांचे शेअरधारक, बँकिंग रेग्युलेशन अॅक्टच्या अंतरग्त रिझर्व्ह बँक  ऑफ इंडिया आणि भारतीय स्पर्धात्मक आयोगाची परवानगी आवश्यक आहे.

सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर फिनकेअर एसएफबी ही बँक एयू एसएफबीमध्ये विलीन होईलआणि फिनकेअर एसएफबीच्या शेअरधारकांना शेअर स्वॅप प्रमाणानुसार फिनकेअर एसएफबीमधील    शेअरच्या बदल्यात एयू एसएफबीमधील शेअरचा वाटा मिळणार आहे. 

विलिनीकरणाच्या अटी

एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांच्या संचालक मंडळाने एकमेकांच्या व्यवसायाचे     कार्यान्वयन पाहून हा निर्णय घेतला आहे. अटींनुसार, विलिनीकरणाच्या पूर्वी फिनकेअर एसएफबीचे प्रवर्तक फिनकेअर बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेटने फिनकेअर एसएफबीमध्ये ७०० कोटी रुपये गुंतवावे.

बन्स एस. मेहता व्हॅल्युअर्स एलएलपी आणि आरबीएसए व्हॅल्युएशन अॅडव्हायजर्स एलएलपी यांची   अनुक्रम एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबी यांनी व्हॅल्युअर्स म्हणून नियुक्ती केली असून, त्यांनी शेअर एक्स्चेंजचे प्रमाण कसे असावे हे सूचविले आहे. त्याला संचालक मंडळाने परवानगी दिली आहे. जेएम फायनान्शिय लिमिटेडने एयू एसएफबीला शेअर एक्स्चेंज प्रमाणाबद्दल फेअरनेस ओपिनियन तर फिनकेअर एसएफबीला आयआयएफएल सेक्युरिटीज लि.ने फेअरनेस ओपिनियन दिले आहे. त्यानुसार फिनकेअर एसएफबीमध्ये २००० शेअर असणाऱ्यांना त्याबदल्यात एयूएसएफबीमध्ये ५७९ शेअर मिळणार आहेत. विलिनीकरण झाल्यानंतर फिनकेअर एसएफबीमधील सध्याचे शेअरधारकाचा एयू एसएफबीमध्ये जवळपास ९.९ टक्के वाटा असेल.

फिनकेअर एसएफबीसाठी या व्यवहारासाठी वित्तीय सल्लागार म्हणून आयसीआयसीआय सेक्युरिटीज लिमिटेड आणि आर्पवूड कॅपिटल प्रा. लिमिटेड यांनी काम पाहिले आहे आणि एयू एसएफबीसाठी     वित्तीय सल्लागार म्हणून अंबिट प्रा. लि. आणि मिरे अॅसेट कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रा. लि. यांनी काम पाहिले आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून एयू एसएफबीसाठी एझेडबी अँड पार्टनर्स यांनी तर फिनकेअर एसएफबीसाठी अनाग्राम पार्टनर्स यांनी काम पाहिले आहे. केपीएमजी आणि पीडब्लूसी यांनी अनुक्रमे एयू एसएफबी आणि फिनकेअर एसएफबीसाठी डिलिजन्स पार्टनर म्हणून काम पाहिले आहे. 

विलिनीकरणांनतर फिनकेअर एसएफबीचे एमडी आणि सीईओ राजीव यादव यांची एयू एसएफबीच्या  डेप्युटी सीईओपदी नियुक्ती करण्यात येईल. ते एयू एसएफबीचे एमडी आणि सीईओ  संजय अगरवाल यांना रिपोर्ट करतील. यादव हे एयू एसएफबीच्या फिनकेअर युनिटचे नेतृत्व करत राहतील, ज्यात फिनकेअर एसएफबीचा सर्वाधिक व्यवसाय आहे. तसेच ते एयू एसएफबीचे एमडी आणि सीईओ यांच्यासोबतच एयू एसएफबीच्या आयटी आणि डिजिटल युनिटचेही संयुक्तरित्या नेतृत्व करतील. त्यातून विलिनीकरणानंतर आयटी इंटिग्रेशनची प्रकिया सुरळीत होईल. त्यांच्या नव्या भूमिकेसाठी यादव यांना एयू एसएफबीच्या संचालक मंडळाच्या बैठकीचे निमंत्रण असेल.

फिनकेअर एसएफबीचे नॉमिनी डायरेक्टर दिव्य सेहगल हे एयू एसएफबीच्या संचालक मंडळात सहभागी होतील आणि विलिनीकरणांतर एकत्रिकरणाची प्रकिया सुरळीत पार पडेल यावर लक्ष ठेवतील.

या विलिनीकरणानंतर एयू एसएफबीचे कार्यकारी संचालक उत्तम टिबरेवाल यांची पदोन्नती करून एयू एसएफबीच्या कार्यकारी संचालक आणि डेप्युटी सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात येईल. 

धोरणात्मक तर्क

ही एक धोरणात्मक, वृद्धीसाठीची भागीदारी आहे. एकाच प्रकारच्या, सारखी मूल्ये, भौगोलिक       दृष्ट्या पुरक आणि उत्पादनांची वैविध्यता यामुळे दोन्ही बँकांच्या विलिनीकरणातून एक संपूर्ण भारतातील रिटेल बँकिंग फ्रँचाईज ठरणार आहे. विलिनीकरणातून तयार होणाऱ्या कंपनीकडे ९८ लाखांहून अधिक ग्राहक असतील, ४३ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी असतील आणि २५ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांमध्ये २३३४ टच पॉइंट्स असतील. 

विलिनीकरणानंतर फिनकेअर एसएफबीच्या ग्रामीण, सुक्ष्मवित्त, तारण आणि सोनेकर्जा व्यवसायांची एयू एसएफबीच्या पोर्टफोलिओमध्ये भर पडणार असून त्यामुळे वित्तीय सर्वसमावेशकता येणार आहे आणि छोट्या उद्योग आणि व्यवसायांवरही भर देता येणार आहे. या विलिनीकरणानंतर तयार होणाऱ्या कंपनीला फिनकेअर एसएफबीच्या ग्रामीण आणि छोट्या शहरांतील नेटवर्कचा फायदा होईल आणि दुसरीकडे एयू एसएफबीच्या उत्कृष्ट उत्पादनांचा आणि डिजिटल क्षमतांमुळे ठेवी आणि कर्जाचे प्रमाण वाढण्यास फायदाहोईल. 

ठेवी, तंत्रज्ञान आणि कुशल कामांचे या दोन बँकाच्या विलिनीकरणानंतर एकत्रिकरण होईल आणि त्यामुळे महत्त्वाच्या वित्तीय सुविधांमध्ये वाढ होईल. याशिवाय दोन्ही बँकांना जीपीटीडब्लूच्या वतीने २०२१ ते २०२३या काळात सातत्याने ग्रेट प्लेस टू वर्कचे प्रमाणपत्र मिळाले आहे आणि लोक तथा संस्कृती हे महत्त्वाचे असल्याने हेच या विलिनीकरणाचे यश आहे. 

या प्रस्तावित विलिनीकरणाबद्दल एयू एसएफबीचे एमडी आणि सीईओ संजय अगरवाल म्हणाले की, वित्तीय सर्वसमावेशकतेच्या समान उद्दिष्टांसाठी काम करत असलेल्या दोन यशस्वी आणि योग्यरित्याचालवल्या जाणाऱ्या एसएफबी फ्रँचाईज एकत्र येत असल्याचा मला आनंद आहे. हे केवळ दोन कंपन्यांचे विलिनीकरण नाही तर मूल्यांचे, उद्दिष्टांचे आणि भविष्यात झेप घेण्याच्या स्वप्नांचे एकत्रिकरण आहे. राजीव आणि त्यांची टीम ही अनुभवी आहे आणि एमएफआय टीम्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेली चांगला अनुभव असलेली टीम आहे. अनेक आव्हाने असताना त्यांनी व्यवसाय उभा केला आहे आणि उत्तम तंत्रस्नेही एसएफबी फ्रँचाईज आहे. आम्ही फिनकेअरच्या सर्व कर्मचाऱ्यांचे एयू एसएफबी कुटुंबात स्वागत करतो आणि सोबत प्रवास करण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत. 

फिनकेअर एसएफबीचे एमडी आणि सीईओ राजीव यादव म्हणाले की, वित्तीय सर्वसमावेशकता असलेलीआघाडीची फ्रँचाईज, ग्राहकोपयोगी उत्पादने आणि उत्तम डिजिटल सहाय्य हा आमचा पाया आहे. दोन यशस्वी संस्थांच्या प्रस्तावित विलिनीकरणामुळे चांगल्या प्रकारे समन्वय होणार आहे. या          विलिनीकरणाचा आमच्या ग्राहकांना फायदा होईल.  त्यांना विस्तारीत शाखांचा आणि वाढीय उत्पादनांचा त्यांना लाफ मिळेल. भारतात वित्तीय सर्वसमावेशकता आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि या विलिनीकरणामुळे त्याला बळ मिळणार आहे. संजय आणि त्यांच्या टीमद्वारे उत्तमरित्या काम करत असलेल्या एयू एसएफबीशी हात मिळवून आणि एक जागतिक दर्जाची बँक तयार करत आहेत.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content