उद्यान उत्सव-1, 2024 अंतर्गत, राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 2 फेब्रुवारी ते 31 मार्च 2024 या कालावधीत जनतेला पाहण्यासाठी खुले राहणार आहे. उद्यानाच्या देखभालीसाठी राखून ठेवलेला सोमवारचा दिवस वगळता आठवड्यातले इतर सहा दिवस सामान्य नागरिक या उद्यानाला भेट देऊ शकतात.
हे अमृत उद्यान खालील दिवशी विशेष वर्गांसाठी खुले राहील.
22 फेब्रुवारी- दिव्यांग व्यक्तींसाठी
23 फेब्रुवारी- संरक्षण, निमलष्करी आणि पोलीस दलातील जवानांसाठी
१ मार्च– महिला आणि आदिवासी महिला बचत गटांसाठी
5 मार्च– अनाथाश्रमातील मुलांसाठी
अभ्यागतांना सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतच्या या सहा तासांच्या कालावधीमध्येच भेट देण्याची परवानगी असेल. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच्या या दोन तासांच्या कालावधीमध्ये आठवड्याच्या इतर दिवशी 7,500 अभ्यागत प्रवेश क्षमता असेल आणि आठवड्याच्या शेवटी प्रत्येक ठराविक कालावधीमध्ये 10,000 अभ्यागत एवढी प्रवेश क्षमता असेल. दुपारच्या चार तासांच्या कालावधीकरिता क्षमता (दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत) आठवड्याच्या इतर दिवशी प्रत्येक ठराविक कालावधी करिता 5,000 एवढी अभ्यागत प्रवेश क्षमता असेल आणि आठवड्याच्या शेवटी 7,500 अभ्यागत एवढी प्रवेश क्षमता असेल. या उद्यानाला भेट देण्यासाठी नागरिकांना खालील संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
https://visit.rashtrapatibhavan.gov.in/visit/amrit-udyan/rE
या उद्यानाला प्रत्यक्ष भेट देणाऱ्या अभ्यागतांना राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 12 जवळील सुविधा केंद्रावर किंवा स्वयं नोंदणी सुविधेवर (सेल्फ सर्व्हिस कियॉस्क) स्वतःची नोंद करावी लागेल.
या उद्यानाला भेट देणाऱ्या सर्व अभ्यागतांना राष्ट्रपती भवनातील फाटक क्रमांक 35मधून प्रवेश दिला जाईल आणि त्याच फाटकातून बाहेर पडता येईल (जिथे राष्ट्रपती भवनाला उत्तर दिशेकडील रस्ता येऊन मिळतो). या उद्यानाला भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या सोयीसाठी, केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशन ते गेट क्रमांक 35पर्यंत शटल बस सेवा सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान दर 30 मिनिटांच्या अंतराने उपलब्ध असेल.
या आपल्या भेटीदरम्यान, अभ्यागतांना बोन्साई गार्डन, म्युझिकल फाउंटन, सेंट्रल लॉन, लाँग गार्डन आणि सर्कुलर बागांचा अनुभव घेता येईल. बाहेर पडताना अभ्यागतांसाठी जेवण्याची सुविधादेखील उपलब्ध असेल.
अभ्यागत, आपल्या लहान मुलांसाठी मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक चाव्या, पर्स/हँडबॅग, पाण्याच्या बाटल्या आणि दुधाच्या बाटल्या सोबत घेऊन जाऊ शकतात. सार्वजनिक मार्गावर ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालये आणि प्रथमोपचार/वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली जाणार आहे.