संयुक्त राष्ट्रांच्या (यू. एन.) शांतता रक्षक मंत्रिस्तरीय बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट 5 ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत घानातील अक्राला भेट देणार आहेत. डिपार्टमेंट ऑफ पीस ऑपरेशन्स, यू. एन. आणि रिपब्लिक ऑफ घाना हे या बैठकीचे यजमान आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांना भेडसावणाऱ्या सुरक्षा आणि कार्यान्वयनविषयक आव्हानांचा सामना करणे आणि जगभरात तैनात असलेल्या या मोहिमांना पाठिंबा निर्माण करणे हे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मंत्रिस्तरीय बैठकीचे उद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या विविध शांतता रक्षक मोहिमांमध्ये जास्तीतजास्त सैन्य आणि सामग्री पाठवून भारत नेहमीच आघाडीवर राहिला आहे.
बैठकीच्या पार्श्वभूमीवर, सदस्य देशांच्या सहभागी मंत्र्यांसमवेत ते द्वीपक्षीय बैठका घेतील आणि संबंध आणखी मजबूत करण्यासाठी संरक्षण सहकार्याच्या बाबींवर चर्चाही करतील. या दौऱ्यादरम्यान ते अक्रा येथील भारतीय समुदायाशीही संवाद साधतील.